Sheezan Khan : तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणी अभिनेता शीजान खानला जामीन

Sheezan Khan
Sheezan Khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही मालिका 'अली बाबा दास्तान ए काबुल'ची अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्या मृत्यूप्रकरणी एक मोठे अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शीजान खान (Sheezan Khan) ला आज कोर्टातून जामीन मिळाला आहे. वसई सेशन कोर्टात आज न्यायाधीश आर डी देशपांडे यांनी शीजान खानला जामीन दिला. (Sheezan Khan )

तुनिषा शर्माने २४ डिसेंबर, २०२२ रोजी सेटवर फाशी घेऊन स्वत:चे आयुष्य संपवले. त्यानंतर पोलिसांनी तुनिषाचा सहकलाकार शीजान खानला अटक केली होती. या प्रकरणात शीजान खानच्या विरोधात पोलिसांनी ५२४ पानांचे चार्जशीट दाखल केले होते. शीजान खान मागील दोन महिन्यांपासून मुंबईतील तुरुंगात आहे. तुनिषा शर्माने जीवन संपवण्याच्या काही तासांपूर्वी सेटहून एक व्हिडिओदेखील पोस्ट केलं होतं. ती या व्हिडिओमध्ये मेकअप करताना दिसत होती. तुनिषा शर्माने कमी वेळेत एंटरटेनमेंट इंडस्ट्रीत खास ओळख बनवली होती. तुनिषाने छोट्या पडद्यावर अनेक बड्या शोजमध्ये काम केलं होतं.

'अली बाबा दास्तान ए काबुल' मालिकेत शीजान खान 'अली बाबा'च्या भूमिकेत होता. तर तुनिषा शर्मा 'शहजादी मरियम' च्या भूमिकेत होती. रिपोर्टनुसार, या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. सोशल मीडियावर नेहमी तुनिषा शर्मा, शीजान खानसोबत ती फोटो शेअर करायची. तुनिषा शीजानच्या कुटुंबीयांनादेखील भेटली होती. शीजान खानच्या आईचे म्हणणे होते की, तुनिषा आपल्या घरामुळे खूप चिंतेत असायची. तुनिषाने छोट्या पडद्यावर बॉलीवूडमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यामध्ये 'फितूर', 'बार बार देखो' आणि 'दबंग ३' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news