Scorpio वृश्‍चिक वार्षिक राशिभविष्य 2022 : कौटुंबिक जीवनात प्रसन्नता | पुढारी

 Scorpio वृश्‍चिक वार्षिक राशिभविष्य 2022 : कौटुंबिक जीवनात प्रसन्नता

Scorpio : आपल्याकडे असामान्य धैर्य, दृढ इच्छाशक्‍ती व विलक्षण मनोबल असते. यशासाठी जी चिकाटी लागते, जे सातत्य लागते ते आपणाकडे आहे. त्यामुळे कोणतेही काम परिपूर्ण झाल्याशिवाय आपण ते सोडत नाही. आपल्याकडे आत्मसंयमन आहे. निग्रह आहे, निर्धार आहे. त्यामुळे वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍ती या जगात यशस्वी झालेल्या असतात. जीव ओतून काम करणे, एकाच ध्येयावर लक्ष ठेवून ते काम पार पाडणे हे आपले वैशिष्ट्य असल्यामुळे स्पर्धात्मक परीक्षेत वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍ती आघाडीवर असतात. संकटाला सामोरी जाणारी, तडफेनेे काम करणारी व कठीण काळात न डगमगणारी आपली रास आहे. कष्ट करण्यात आपण कोणालाही हार जात नाही. भावनेच्या आहारी न जाण्याचा आपला स्वभाव आहे. आपल्याकडे महत्त्वाकांक्षा आहे, चातुर्य आहे, थोडा कावेबाजपणा आहे, मुत्सद्दीपणा आहे. कुटुंबातील सर्वांनी आपल्या कलाप्रमाणे व विचाराप्रमाणे राहावे अशी आपली इच्छा असते.

Scorpio www.pudhari.news
वार्षिक राशिभविष्य 2022

आरोग्य  Scorpio

वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहणार आहे. कर्तृत्वाला संधी मिळणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन सकारात्मक राहील. आपल्या वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. सतत कार्यरत राहाल. व्यवसायामध्ये होणारी प्रगती संतुष्टमय राहील. यामुळे मानसिक प्रसन्नता लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने समाधानकारक आहे. आरोग्य चांगले राहील. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगला असेल. मानसिक प्रसन्नता राहील. कौटुंबिक जीवनात सौख्य लाभेल. एकूणच वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष चांगले आहे. यावर्षी आपणाला कौटुंबिक जीवनात अत्यंत समाधानाचे वातावरण लाभणार आहे. त्याचाही इष्ट परिणाम आरोग्यावर होईल. संपूर्ण वर्ष आरोग्याचे समाधान व मानसिक प्रसन्नता लाभेल.

खालील कालखंड आरोग्याच्या दृष्टीने चांगले आहेत.

दि. 01/01/2022 ते दि. 01/04/2022
दि. 27/04/2022 ते दि. 26/06/2022
दि. 01/07/2022 ते दि. 13/07/2022
दि. 31/08/2022 ते दि. 24/09/2022
दि. 14/11/2022 ते दि. 31/12/2022
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींनी दि. 01/04/2022 ते दि. 17/05/2022, दि. 26/06/2022 ते दि. 10/08/2022 या कालखंडात आपण आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच खालील कालखंडातही आपली प्रकृती बिघडणार नाही याकडे लक्ष द्यावे. दि. 15/10/2022 ते दि. 13/11/2022

व्यवसाय व आर्थिक स्थिती scorpio

व्यापार, व्यवसाय, उद्योग या क्षेत्रांच्या दृष्टीने हे वर्ष चांगले आहे. प्रगती समाधानकारक राहील. व्यवसायाची उलाढाल वाढविण्यात यशस्वी व्हाल. शत्रुपिडा नाही. आरोग्याची साथ चांगली मिळणार आहे. चिकाटीने काम कराल. व्यवसायाकडे अधिक लक्ष द्याल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न सुटतील. व्यवसाय, उद्योग, कारखानदारी, व्यापार, धंदा व आर्थिक लाभ या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष अभूतपूर्व यशाचे, भरभराटीचे, आर्थिक लाभाचे जाणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढेल. तुमच्या व्यवसायाच्या कार्याची कक्षा वाढणार आहे.

खालील कालखंड व्यवसायासाठी व आर्थिक लाभासाठी चांगले आहेत.

दि. 01/01/2022 ते दि. 31/03/2022
दि. 27/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 25/10/2022
दि. 16/11/2022 ते दि. 31/12/2022

नोकरी

नोकरीतील व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक आहे. ज्यांना बदली हवी आहे, त्यांचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना नोकरीत बढतीचे योग येतील. संपूर्ण वर्षभर नोकरीत वातावरण चांगले राहणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा राहणार नाही. विरोधकांवर मात कराल. यावर्षी तुमच्या प्रगतीमध्ये कोणाचाही अडथळा येणार नाही. प्रगती चांगली होईल. एकूणच नोकरीच्या दृष्टीने हे वर्ष वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना चांगले आहे. तुमच्या कर्तृत्वाला संधी मिळेल. तुमच्या कामगिरीवर वरिष्ठ खूश असणार आहेत, समाधानी असणार आहेत. थोरामोठ्यांचे योग्य सहकार्य लाभेल.

 

खालील कालखंड नोकरीतील व्यक्‍तींना अनुकूल आहेत.

नोकरीतील व्यक्‍तींना दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड हा बढतीच्या दृष्टीने अधिक चांगला आहे व त्यानंतरचा कालखंड हा स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक चांगला आहे.
दि. 14/05/2022 ते दि. 15/06/2022
दि. 17/07/2022 ते दि. 17/10/2022
दि. 17/11/2022 ते दि. 18/12/2022

प्रॉपर्टी

प्रॉपर्टी, गुंतवणूक या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक आहे. कौटुंबिक जीवनातील बर्‍याचशा गोष्टी मार्गी लागतील. प्रॉपर्टी व गुंतवणुकीसाठी विशेषकरून दि. 12/04/2022 पूर्वीचा कालखंड अधिक चांगला आहे. ज्यांना आयुष्यात एकदाच प्रॉपर्टीचे व्यवहार करायचे आहेत त्यांनी जागा, जमिनी, फ्लॅट, बंगला, वाहन खरेदी शक्यतो दि. 14/04/2022 पूर्वी करावी. एकूणच हे वर्ष वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना अनेक दृष्टीने चांगले आहे. त्यामुळे प्रॉपर्टीसंदर्भातही तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील.

खालील कालखंड प्रॉपर्टी, गुंतवणुकीच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 01/04/2022 ते दि. 26/05/2022
दि. 06/08/2022 ते दि. 18/08/2022
दि. 11/11/2022 ते दि. 05/12/2022

संततिसौख्य

संततिसौख्याच्या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक जाणार आहे. विद्यार्थ्यांना यावर्षी यश संपादन करण्याच्या दृष्टीने अधिक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. यावर्षी शनीची संपूर्ण वर्षभर संततीच्या स्थानावर दृष्टी आहे. पालकांना मुला-मुलींच्या प्रगतीबाबत चिंता लागून राहील. या कालखंडात मुला-मुलींबरोबर विनाकारण वादविवाद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना हातावर हात ठेवून चालणार नाही. मुला-मुलींचे शैक्षणिक प्रश्‍न, परीक्षेतील यश, शाळा, कॉलेजमधील प्रवेश, मुला-मुलींचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न या दृष्टीने हे वर्ष समाधानकारक राहील. विशेषत: दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा अत्यंत चांगला आहे. दि. 12/04/2022 नंतरच्या कालखंडात विद्यार्थ्यांना सुयश लाभेल. नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न मार्गी लागतील. मुला-मुलींसंदर्भात एखादी भाग्यकारक घटना घडेल.

खालील कालखंड संततिसौख्याच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 06/03/2022 ते दि. 22/05/2022
दि. 16/07/2022 ते दि. 25/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 05/12/2022

वैवाहिक सौख्य  Scorpio

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक आहे. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याच्या दृष्टीने दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड चांगला आहे. विवाहाला गुरूची जी अनुकूलता लागते ती दि. 12/04/2022 नंतर असणार आहे. विवाह, साखरपुडा व कोणतेही शुभकार्य यासाठी दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड अनुकूल आहे. हे वर्ष मुला-मुलींचे विवाह जमणे व होणे या दृष्टीने चांगले आहे. मात्र, साखरपुडा किंवा विवाह शक्यतो दि. 12/04/2022 नंतरच करावेत. दि. 12/04/2022 ते दि. 31/12/2022 हा सर्व कालखंड विवाहेच्छूंचे विवाह जमणे व होणे या दृष्टीने अत्यंत चांगला आहे. या कालखंडात वृश्‍चिक राशीच्या विवाहेच्छू मुला-मुलींचे विवाह होण्याची फार मोठी शक्यता आहे.

वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने खालील कालखंड चांगले आहेत.

दि. 06/03/2022 ते दि. 24/03/2022
दि. 27/04/2022 ते दि. 22/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 13/07/2022
दि. 06/08/2022 ते दि. 18/10/2022
दि. 12/11/2022 ते दि. 05/12/2022

प्रतिष्ठा, अधिकारपद, मानमान्यता

 Scorpio सामाजिक, सार्वजनिक, राजकीय व शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांत यश, प्रतिष्ठा या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष चांगले आहे. तुमच्या क्षेत्रात तुम्हाला संधी मिळेल. प्रतिष्ठा लाभेल. काहींना मानसन्मानाचे योग येतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. विशेष खटपट न करता अधिकारपदी तुमचे नाव सुचविले जाईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. तुमच्या आशाआकांक्षा पूर्ण होतील.

प्रतिष्ठा, मानसन्मान, सुसंधी, अधिकार, यश मानमान्यता, कीर्ती यासाठी खालील कालखंड चांगले आहेत.

दि. 12/02/2022 ते दि. 14/03/2022
दि. 01/04/2022 ते दि. 14/04/2022
दि. 14/05/2022 ते दि. 14/06/2022
दि. 16/07/2022 ते दि. 16/10/2022
दि. 16/11/2022 ते दि. 07/12/2022

सुसंधी

सुसंधी, प्रसिद्धी, अंगिकृत कार्यात यश या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष अत्यंत चांगले आहे. तुमच्या आशाआकांक्षा, स्वप्ने, मनोरथ यावर्षी निश्‍चित साकार होतील. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत काम करण्याची संधी लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. तुमचे परिश्रम कारणी लागतील. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. बौद्धिक व कलेच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना हे वर्ष असामान्य व असाधारण यशाचे आहे. दि. 12/04/2022 नंतर तुमच्या क्षेत्रात तुम्ही अलौकिक कामगिरी करून दाखवू शकाल. तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा ठसा उमटवू शकाल.

खालील कालखंड सुसंधी, प्रसिद्धीच्या दृष्टीने अनुकूल आहेत.

दि. 06/03/2022 ते दि. 23/05/2022
दि. 18/06/2022 ते दि. 31/08/2022
दि. 24/09/2022 ते दि. 26/10/2022
दि. 11/11/2022 ते दि. 16/12/2022

सारांश scorpio

वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष समाधानकारक राहणार आहे. आरोग्य चांगले राहील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत काहींना बढती मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास कमी होणार आहे. विरोधकांवर मात कराल. शत्रुपिडा नाही. नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. दि. 12/04/2022 नंतर तुम्हाला नवीन संधी लाभेल. प्रसिद्धी लाभेल. एकूणच हे वर्ष वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना अनेक दृष्टीने समाधानकारक ठरेल. संततिसौख्य लाभेल. मुला-मुलींची प्रगती होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात वेगाने प्रगती होईल. आरोग्य, मुला-मुलींची प्रगती, त्यांचे नोकरी, व्यवसायाचे प्रश्‍न या दृष्टीने व कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना हे वर्ष खूपच चांगले आहे. तुमच्या जीवनात हे वर्ष नोंद करून ठेवण्यासारखे आहे. वृश्‍चिक राशीच्या मुला-मुलींचे विवाह यावर्षी पार पडतील. आरोग्याची साथ चांगली आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. हे वर्ष एकूणच कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने खूपच चांगले आहे. वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍तींना दि. 12/04/2022 नंतरचा कालखंड हा अत्यंत सुयशाचा व विशेष लाभाचा ठरणार आहे. दि. 12/04/2022 नंतर मानसिक उत्साह वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जीवन, सार्वजनिक जीवन या क्षेत्रांतील निर्णय अचूक ठरणार आहेत. यावर्षी आपणाला नवी दिशा सापडेल, नवा मार्ग दिसेल. वृश्‍चिक राशीच्या व्यक्‍ती दि. 12/04/2022 नंतर आपापल्या क्षेत्रात काही विशेष कामगिरी करून दाखवतील. तुम्हाला आजपर्यंत जी संधी लाभली नव्हती, ती आता लाभणार आहे. अनेकांचे सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या आशाआकांक्षा सफल होतील. मुला-मुलींसंदर्भात काही चांगल्या घटना घडतील. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. यावर्षी आपण आपले ध्येय निश्‍चितरूपाने गाठू शकाल. सामाजिक, सांस्कृतिक, सार्वजनिक जीवनात तुम्ही आघाडीवर राहाल. आपले विचार व आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. यावर्षी आपले जीवन समृद्ध व संपन्न होणार आहे. घरामध्ये शुभकार्य किंवा मंगलकार्य घडू शकते. हे वर्ष आपणास ध्येयपूर्तीकडे घेऊन जाणारे आहे.

– प्राचार्य रमणलाल शहा

Back to top button