हवामान अंदाज : राज्याच्या ‘या’ भागांत पावसाची शक्यता, थंडी कमी होणार | पुढारी

हवामान अंदाज : राज्याच्या 'या' भागांत पावसाची शक्यता, थंडी कमी होणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत पुढील दोन ते तीन दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. किमान तापमानात मात्र किंचित वाढ झाली आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. अरबी समुद्राच्या ईशान्य भागापासून ते अगदी मध्य भारतापर्यंत बाष्प आहे. हे बाष्प पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. याचबरोबर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून मध्य भारताकडे पुढील चार ते पाच दिवस वारे वाहणार आहेत. परिणामी, राज्यातील थंडी कमी होऊन ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे शहर आणि परिसरात पुढील पाच दिवस अंशत: आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 10 ते11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ढगाळ वातावरण असले, तरी थंडीत वाढीची शक्यता आहे.

हेही वाचलतं का? 

Back to top button