जिल्ह्यात 412 मुलांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया | पुढारी

जिल्ह्यात 412 मुलांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) यावर्षी 412 लहान मुलांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेसाठी लाखोंचा खर्च येत असल्याने सामान्यांना परवडणारा नसतो. त्यामुळे आरबीएसकेच्या माध्यमातून गरजूंना नवसंजीवनी मिळत आहे. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत राज्यात एकूण 5421 हृदयरोग शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यातील सर्वाधिक शस्त्रक्रिया पुणे जिल्ह्यात झाल्या आहेत. पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये 251, नाशिकमध्ये 243, सोलापूरमध्ये 224, कोल्हापूरमध्ये 219 शस्त्रक्रिया पार पडल्या. 0 ते 18 वयोगटातील मुलांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी याअंतर्गत प्रयत्न केले जात आहेत.

आरबीएसके कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांची व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. पुणे जिल्ह्यांतर्गत 73 आरोग्य तपासणी पथके आहेत. प्रत्येक पथकामध्ये 1 पुरुष वैद्यकीय अधिकारी, 1 स्त्री वैद्यकीय अधिकारी, 1 औषध निर्माता आणि 1 परिचारिका यांचा समावेश असतो. अंगणवाडी स्तरावरील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते आणि शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एकदा करण्यात येते.

आरबीएसकेअंतर्गत जिल्ह्यातील शस्त्रक्रिया

  •  हृदयरोग शस्त्रक्रिया – 412
  •  बहिरेपणावरील (कॉकलिअर) शस्त्रक्रिया – 14
  •  इतर शस्त्रक्रिया – 2974

हेही वाचा

Back to top button