Malai Kulfi : उन्हाळ्यात फक्त ‘या’ तीन वस्तुंनी बनवा मलईदार कुल्फी | पुढारी

Malai Kulfi : उन्हाळ्यात फक्त 'या' तीन वस्तुंनी बनवा मलईदार कुल्फी

पुढारी ऑनलाईन डेस्क : कडक उन्हाळ्यामुळे सर्व नागरिक हैराण झाले आहेत. एकिकडे कामाच्या गडबडीत आलेल्यांना धामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. तर दुसरीकडे लोकांचा कल शीतपेयाकडे वळला आहे. यात अनेकांचा कल गाजर, काकडी, लिंबू सरबत, कोल्ड्रिंग्स, मसाले ताक, दही, थंडगार पाणी यासारख्या पदार्थाकडे वाढताना दिसतोय. या दिवसांत आवर्जून मग थंडगार आईस्क्रिमचा विचार केला जातो. मग पुन्हा कडक उन्हात बाहेर पडून आईस्क्रिमची दुकाने शोधली जातात. मग बाहेर न पडता घरीच बनवा मलईदार कुल्फी… ( Malai Kulfi )

साहित्य-

दुध – एक लिटर
साखर – चार चमचे
पारलेजी चॉकलेट- २० नग

कृती-

१. पहिल्यांदा गॅसवर पसरट भांडे ठेवून त्यात ताजे एक लिटर दूध घालावे.

२. नंतर हे दुध मलई येईपर्यत मंद आचेवर उकळावे.

३. दरम्यान एका पळीच्या साहाय्याने दुध लागू किंवा करपू नये म्हणून सतत हलवत रहावे.

४. कमीत- कमी २० मिनिटापर्यत हे दुध उकळत ठेवावे.

५. दुध घट्ट होत आल्यावर त्यात चार चमचे साखर घालून हलवावे. नंतर हे मिश्रण थंड होण्यास गॅसवरील भांडे खाली उतरून ठेवावे.

६. यानंतर पारलेजी चॉकलेटचे (२० नग) घेवून त्याचे रॅपर काढावे.

७. दुसऱ्या एका भांड्यात चॉकलेट आणि थोडे- थोडे दुध घालून ते हलवत रहावे.

८. जोपर्यत चॉकलेट पूर्ण दुधात मिक्स होत नाहीत तोपर्यत हे मिश्रण हलवावे. यनंतर शेवटी थंड होण्यास ठेवलेल्या दुधात मिक्स करावे.

९. दोन्ही मिश्रण एकत्रित करून हलवावे आणि नंतर कुल्फीच्या साच्यात मिश्रण भरावे. (टिप- कुल्फीचे साचे नसतील तर हे मिश्रण काचेचा ग्लास किंवा उभा असलेल्या वस्तूमध्ये घातले तरी चालते.)

१०. यानंतर यात आईस्क्रीमच्या कांड्या कुल्फीच्या मधोमध घालाव्यात.

११. शेवटी हे कुल्फीच्या साचे फ्रिजमध्ये ठेवावे.

१२. यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घेवून फ्रिजमधील कुल्फी त्यात बुडवावी आणि हलक्या हातांनी कुल्फी बाहेर काढावी.

१३. मग तयार होईल घरच्याघरी उन्हाळ्यात थंडावा देणारी मलईदार कुल्फी. लगेच सेव्ह करा. ( Malai Kulfi )

Malai Kulfi Recipe, How to make Malai Kulfi Recipe - Vaya.in

Malai Kulfi from Dishoom: From Bombay with Love by Shamil Thakrar

हेही वाचा : 

 

Back to top button