Yearly Horoscope 2023 : आजची रास कर्क : वर्षाची सुरुवात प्रगतिकारक; पण वर्षभर अडचणीतून प्रवास

आजची रास कर्क
आजची रास कर्क
Published on
Updated on

होराभूषण : रघुवीर खटावकर; कर्क : वर्षाची सुरुवात प्रगतिकारक; पण वर्षभर अडचणीतून प्रवास – ही रास जलतत्त्वाची असून या राशीत पुनर्वसु ४ थे चरण (वायू तत्त्व) पुष्य (अग्नी तत्त्व) व आप्लेषा (जल तत्त्व) अशी नक्षत्रे आहेत. राशीत गुरू उच्च फल देतो. कर्क ही गुरूच्या मित्रग्रहाची चंद्राची रास असून न्यायप्रिय शनीच्या देवगणी पुष्प नक्षत्रात ५ अंशात सिंह नवमाशांत तो उच्च फल देऊ शकतो. गुरू एप्रिल २१ पर्यंत स्वराशीत मीनेत कर्क राशीच्या भाग्यात असल्यामुळे भरभरून चांगली फळे देणार आहे. या काळात गुरूकृपा लाभेल. आपणही कर्तव्यदक्ष कार्यतत्पर रहाल. या काळात प्रगतीची कामे आपली पूर्ण शक्ती लावून केली पाहिजेत. गुरूसारखा ग्रह आपला भाग्यविधाता असून १२ वर्षांनंतर तो उत्तम फल देण्यासाठी मीन राशीत आला आहे. गुरुतुल्य, वरिष्ठ यांचे मार्गदर्शन घ्या. विवाह जुळेल. संतती होईल. विद्याभ्यासास लक्षणीय प्रगती होईल. (Yearly Horoscope 2023)

एप्रिल २१ नंतर गुरु मेष राशीत तुमच्या राशीला १० वा असेल. या पुढील काळात आपल्या कामाची गुणवत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला तर पुढील वर्षी येणारा ११ वा गुरू तुम्हाला जास्तीत जास्त लाभ करून देईल. हे वर्ष खरे तर आत्मपरीक्षण करण्याचे तुमच्यासाठी रहाणार आहे. कर्क ही रास जलतत्त्वाची आहे. जनतेच्या हृदयावर राज्य करणारी ही रास आहे. मातृप्रेमी, राष्ट्रप्रेमी अशा या व्यक्ती राष्ट्राच्या भाग्योदयास कारणीभूत ठरणारा असतात.

या व्यक्ती प्रेमळ असतात, पण चंचल असतात. यांना प्रवासाची पर्यटनाची आवड असते. जास्त भावनिक असतात. यावर्षी कर्क व्यक्तींच्या भाग्यविधाता गुरूबरोबर हर्षल व राहू (नोव्हेंबर) राशीच्या दशमस्थानात रहाणार आहे. धंदा, व्यवसायात इतक्या उलाढाली बदल होतील की कामाची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी यांना वेळ देता येणार नाही. हे बदल बरेचसे अनुकूल असतील. राहू सुद्धा गुरूबरोबर असल्यामुळे (भाग्येश गुरू) राजयोगकारक फले देण्याचा प्रयत्न करील, पण धंदा-व्यवसाय व तुमच्या कार्यक्षेत्रात शत्रू निर्माण होतील. गुरु, हर्षल योगामुळे बरेच वेळा हातातून निसटून जाणारी संधी तुम्ही जाऊ देणार नाही पण गाफील राहू नका. केतूमुळे घरगृहस्थीची काळजी लागून राहील. वर्षभर शनी कुंभ राशीच्या अष्टमस्थानी राहील. विलंब, अडचणी त्रास यांचा अनुभव येत राहील. पण तो स्वराशीत असल्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होणार नाही. संततीला स्वतशला कष्ट जाणवतील. आर्थिक आवकमंदावेल, नेपच्यूनमुळे विकासाच्या वाटचालीत अनाकलनीय अडथळे येऊ शकतील.

आपल्या राशीला भाग्यकारक गुरूबरोबरच बलवान अशा योगकारक मंगळाची साथ मिळत असते. एप्रिल पर्यंत नविन वास्तू प्राप्ती, घराचे नूतनीकरण इ. कामे अडचणी आल्या तरी आपण करू शकाल. वर्षाच्या सुरुवातीलाच मंगळ वृषभ राशीत तुम्हाला लाभकारक रहाणार असून अडचणीतूनही यश मिळवून देणारा आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कन्या राशीतील मंगळ, आरोग्य व सुवर्णालंकाराची प्राप्ती करून देईल. कर्क राशीला मंगळाचे भ्रमण यावर्षी वृषभ ते वृश्चिक या राशीतून होईल. कर्क राशीला जुलै-ऑगस्टमधील सिंहेतील मंगळाचे भ्रमण त्रासदायक जाईल. घशाचे विकार जाणवतील. अपघात होणार नाहीत याची काळजी घ्या. कर्क राशीला मेष वृषमेतील (एप्रिल-मे मे-जून), कन्वेतील (सप्टें- ऑक्टो.) व धनूतील (डिसें.) रवी कामात यश मिळवून देणारा राहील. कर्क राशीला कुंभेतील (फेब्रु. – मार्च) मिथुनेतील (जून-जुलै) तूळेतील (ऑक्टो.-नोव्हें.) रवी मोठे खर्च वाढवणारा, घरगृहस्थीची चिंता लावणारा व धंदा व्यवसायात मंदीचे, स्पर्धेचे वातावरण निर्माण करणारा आहे.

कर्क राशीला धनू – मकर (डिसें. जाने.) मेष (मार्च-एप्रिल) राशीत शुक्र असताना धंदा-व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्यास नुकसान होऊ शकते. मनावरील भावनिक दडपण वाढू शकते. कर्क राशीला प्लुटो पुढील अनेक वर्षे (सुमारे २०-२२ वर्षे) ७ वा म्हणजे मकर राशीत रहाणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनाविषयीचे विचार बरेच क्रांतिकारक राहतील. त्यामुळे भावनिक दडपण इतर ग्रहांच्या अशुभ योगात वाढण्याची शक्यता राहील. शनी जानेवारी २०२३ रोजी कुंभ राशीत तुमच्या राशीला रौप्य पादाने आलेला आहे. त्यामुळे त्याची शुभ फले तो वाढवेल, शारीरिक दगदग कमी करण्यास मदत करणारा आहे. शनी अडीच वर्षे कुंभ राशीत राहणार आहे. नेपच्यून १८ फेब्रुवारी २०२३ रोजी मीन राशीत तुमच्या राशीला ताम्रपादाने आलेला आहे. तो श्री प्राप्ती करून देणारा आहे. म्हणजे धनसंपत्ती, विद्या, यश यांची प्राप्ती करून देणारा आहे. तो पुढील १४ वर्षे मीन या राशीत रहाणार आहे. तो तुमच्या राशीतील भाग्यकारक अनुभव वाढविण्यास मदत करणारा आहे. गुरू २१ एप्रिल २०२३ रोजी मेष राशीत तुमच्या राशीच्या दशमस्थानी ताम्रपादाने आलेला आहे. तो श्रीप्राप्ती म्हणजे धनसंपदा, विद्या, यश मिळवून देण्यास मदत करणारा रहाणार आहे. तो पुढे एक वर्ष मेष राशीत रहाणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news