Yearly Horoscope 2023 : आजची रास वृषभ : आध्यात्मिक साधनेत विलक्षण प्रगती | पुढारी

Yearly Horoscope 2023 : आजची रास वृषभ : आध्यात्मिक साधनेत विलक्षण प्रगती

होराभूषण रघुवीर खटावकर ; वृषभ रास ही रास पृथ्वी तत्त्वाची असून त्यात कृतिका २, ३, ४ चरणे (अग्नी तत्त्व), रोहिणी (पृथ्वी तत्त्व) मृग १,२ चरणे (वायू तत्त्वाची आहेत.)

चंद्र व शुक्र हे दोन फल स्त्री ग्रह आहेत. त्यामुळे | शुक्राच्या वृषभ या मूलत्रिकोण राशीत कृतिक या रवीच्या नक्षत्रात चंद्र उच्च फल देतो. कारण चंद्र हा शुभ व अशुभ अशी २ प्रकारची फले देतो व त्यासाठी कृतिका हे राक्षसगणी नक्षत्र त्यास जास्त अनुकूल आहे. चंद्र व शुक्र दोघेही जलतत्त्वाचे ग्रह आहेत.

वृषभ राशीस्वामी शुक्र हा शुभ ग्रह असून तो सर्व स्थानात शुभ फले देऊ शकतो. गोचर भ्रमणात तो १२ पैकी ९ राशीच्या भ्रमणात शुभ फल देत असतो. हा एकमेव ग्रह आनंदी म्हणता येईल असा ग्रह आहे. तो कला, सौंदर्य व प्रणयाचा कारक आहे. तो प्राणीमात्रांना धरून ठेवणारा, प्रवासी असा आहे. यांना एकमेकांपासून कोणीही दूर जाऊ नये असे वाटते. या राशींच्या स्त्रियात सर्व प्रकारची स्त्री सुलभता लावण्य पहावयास मिळते. सर्व प्रकारच्या सुखपभोगाच्या वस्तू, वाहने यांच्यावर शुक्राचा अंमल असतो.

या वर्षात हर्षल राहू मेषेत वृषभ राशीच्या १२ व्या स्वजनांच्यापासून लांब जावे लागेल. स्थानात आहे. वर्षभरात अनेक आकस्मिक खर्च उद्भवतील. अवैध मार्ग अवलंबाल तर कायद्याच्या कचाट्यात सापडाल. कारण १७ जानेवारीला कुंभेत ग्रहांची दृष्टी या हर्षल राहूवर रहाणार आहे. अनावश्यक खर्च होईल व तो हाताबाहेर जाईल. या वृषभ राशीचा भाग्यविधाता शनी असून कर्माचाही कारक आहे. कुंभेतील दशमातील हा शनी स्पर्धक, विरोधकांचा जोर अधिकार देईल व कामाला यशही देत राहील. तो शक्य योगात असल्यामुळे प्रचंड अधिकार देईल. कर्माला भाग्याची जोड मिळत जाईल. घरातील वृद्ध, आई- वडिलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराच्या प्रकृतीस जपावे लागेल. कुटुंबात समस्या निर्माण होतील.

गुरू २१ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश करील. आध्यात्मिक वृत्ती बनेल. परदेशगमनाची संधी लाभेल. आर्थिक नुकसान होईल. कृष्ण कारस्थानात अडकाल पण त्यावर मात कराल. धाडसी कृत्यात यश मिळेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावता येतील. पण तुमच्या राशीस्वामी शुक्राचे भ्रमण या वर्षात मकर ते वृश्चिक या १० राशीतून होईल. शुक्र राशीस्वामी असल्यामुळे त्याची सर्व भ्रमणातील फले तुम्हाला शुक्र मिळत असणार तरी राशीपासूनच्या ६, ७, १० व्या स्थानातील म्हणजे मेष, तूळ, वृश्चिक, कुंभ राशीतील तो जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर महिन्यातील शुक्राचे भ्रमण वाढवून भावनिक वादळ निर्माण करणारे राहील.

जूनमधील कर्कराशीतील बुध-शुक्राचे भ्रमण कला, क्रीडा, शिक्षण क्षेत्रात अनुकूल घडवणारे राहील..

जुलै-ऑगस्ट व नोव्हेंबर-डिसे. मधील मंगळाचे भ्रमण गृहसौख्य बिघडवणारे, पोटाचे तक्रार निर्माण करणारे, भावनिक दडपण निर्माण करणारे आहेत. जुलै-ऑगस्टमध्ये प्रॉपर्टीची कामे होतील. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ अनुकूल राहील. वृषभ राशीच्या व्यक्तींना रविचे कर्क राशीतील (जुलै, ऑगस्ट) तूळ राशीतील (ऑक्टो.-नोव्हे.) व कुंभ मीन राशीतील फेब्रु.- मार्च एप्रिल महिन्यातील भ्रमण यश मिळवून देणारे राहील.

सिंह राशीतील मंगळाचे भ्रमण विवाहोत्सुक मुलींचे विवाह जुळण्यास अनुकूल राहील. गुरू राशीला १२ असला तरी विवाह ठरू शकेल. वृषभ राशीसाठी लोहपादाने आलेला गुरू या व्यक्तींना काही प्रमाणात कष्ट देणारा राहील. वृषभ राशीतील सुवर्णपादाने आलेला शनि (कुंभेतील ) या व्यक्तींना धंदा-व्यवसायाची व गृहसौख्याची काही प्रमाणात चिंता निर्माण करणारा आहे. वृषभ राशीसाठी १४ वर्षांसाठी रौप्य पादाने आलेला मीन राशीतील नेपच्यून मात्र शुभ फले निर्माण करणारा आहे. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ती या नेपच्यूनमुळे मोठे यश प्राप्त करू शकतील, पण प्रलोभने टाळावी लागतील.

वृषभ राशीच्या भाग्य राशीत मकर राशीत प्लुटो रहाणार आहे. प्लुटोमुळे आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी लायक समजले जातील. वर्षभर नेपच्यून प्लुटो (लाभ) मिरकादश योगारा लाभ व भाग्यस्थानातून योग करणार आहेत. त्यामुळे वृषभ राशींच्या व्यक्तीं सर्वांना न्याय मिळालाच पाहीजे अशा प्रवृत्तीच्या राहतील.

मेष राशीतील गुरूहर्षल युती प्रबळ अंतर्ज्ञान शक्तीचा नवनिर्माण शक्तीशी सांगड घालणारा योग आहे. गुरू- पलुटो योगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींच्या स्वतःच्या ताकतीवर विश्वास रहाणार नाही. एकदंरीत पाहता आध्यात्मिक साधनेत विलक्षण प्रगती करणारे हे वर्ष राहील.

Back to top button