गणेश उत्सव २०२३ : लाडक्या गणरायांच्या आगमनाची घरोघरी तयारी सुरू आहे. घराघरात साफ-सफाई, रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. गणपती बाप्पांसाठी वैशिष्ट्यपूर्ण देखावे करण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे. गणेश मूर्तींनी बाजारपेठा सजल्या आहेत. लोकांनी आधीच गणेश मूर्ती आगाऊ पैसे देऊन बूक करून ठेवली आहे. तर गणपती सह गौरीचे आगमन करण्यासाठीचीही लगबग सुरू आहे. गौरी-गणपतींसाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक मखरे आणण्यात आली आहे. तर मंडळांनी गणेश मूर्ती मंडळात आणून ठेवल्या आहेत. यावर्षी गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. या दिवशी पहाटेपासून ते दुपारपर्यंत श्रीगणेशाची स्थापना करावी, असे पंचांगकर्त्यांनी सांगितले आहे. गणपतीच्या आरतीसह श्री हरितालिकेची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
हरअर्धांगी वससी। जाशी यज्ञा माहेरासी॥
तेथे अपमान पावसी। यज्ञकुंडी गुप्त होसी ॥1॥
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके॥
आरती ओवाळीते। ज्ञानदीपकळीके ॥धृ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी॥
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥2॥
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके॥
आरती ओवाळीते। ज्ञानदीपकळीके ॥धृ॥
तापपंचाग्निसाधनें। धूम्रपाने अधोवदने॥
केली बहु उपोषणे। शंभू भ्रताराकारणे ॥3॥
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके॥
आरती ओवाळीते। ज्ञानदीपकळीके ॥धृ॥
लीला दाखविसी दृष्टी। हे व्रत करिसी लोकांसाठी॥
पुन्हा वारिसी धूर्जटी। मज रक्षावे संकटी ॥4॥
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके॥
आरती ओवाळीते। ज्ञानदीपकळीके ॥धृ॥
काय वर्णूं तव गुण। अल्पमति नारायण॥
माते दाखवी चरण। चुकवावे जन्ममरण ॥5॥
हेही वाचलेत का?