cars discount offer 2021 : होंडा कार्सवर ५७ हजारांपर्यंत सूट, सिटी, अमेझवर सर्वोत्तम ऑफर्स | पुढारी

cars discount offer 2021 : होंडा कार्सवर ५७ हजारांपर्यंत सूट, सिटी, अमेझवर सर्वोत्तम ऑफर्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : होंडा (Honda) कार्सकडून भारतात गणेशोत्सावानिमित्त ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स (cars discount offer 2021) देण्यात येणार आहेत. कंपनीकडून होंडा कार्सवर तब्बल ५७ हजारांची सुट देण्यात येणार आहे. होंडाकडून (cars discount offer 2021) 4th आणि 5th जनरेशनमध्ये city, jazz, wr-v आणि अपडेटेड Amaze या वाहनांवर खास ऑफर्स देणार आहे.

नवीन २०२१ होंडा अमेझवर भरघोस ऑफर

अद्ययावत २०२१ होंडा अमेझ १७ ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आली. आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेऊन, नवीन अमेझसाठी १८ हजार रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह ऑफर देण्यात आली आहे. नवीन Amaze फेसलिफ्टच्या सर्व प्रकारांवर, होंडाने ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपये कॉर्पोरेट सवलत दिली आहे.

२०२० होंडा अमेझवर ऑफर

२०२० वर्षाच्या मॉडेलवर तुम्ही ५७ हजार ४४ रुपयांपर्यंत बचत करू शकता. २०२० Amaze च्या VMTआणि VXMT पेट्रोल एडिशन १० हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ हजार रुपयांचा कॉर्पोरेट सूटसह उपलब्ध आहेत. याशिवाय, ते ५ हजार रुपयांची रोख सवलत किंवा ६ हजार रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज घेऊ शकता.

होंडा सिटी 5th एडिशनवर खास ऑफर

सप्टेंबरमध्ये 5th-Generation City ३७ हजार ७०८ रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. Honda City च्या सर्व पेट्रोल व्हेरिएंट वाहनांवर ५ हजार रुपयांची एक्सचेंज डिस्काउंट, तर ५ हजार रुपये लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि ८ हजार रुपयांच्या कॉर्पोरेट सवलतीसह उपलब्ध आहेत. ग्राहक १० हजार रुपयांची रोख सवलत किंवा १० हजार ७०८ रुपयांपर्यंत FOC अॅक्सेसरीज पॅकेज मिळणार आहे.

Honda City 4th Gen वर ऑफर्स

सप्टेंबरमध्ये, 4th generation Honda City sedan २२ हजार रुपयांपर्यंतच्या मोफत सुवीधा मिळत आहे. ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ८ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट समाविष्ट आहे.

Honda WR-V वर ऑफर्स

या महिन्यात नवीन होंडा WR-V वर ३९ हजार ९९८ रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. यामध्ये १० हजार रुपयांची एक्सचेंज सूट, ५ हजारांचा लॉयल्टी बोनस, ९ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि ४ रुपयांची कॉर्पोरेट सवलत देण्यात आली आहे.

याशिवाय १० हजार रुपयांची रोख सवलत आणि १२ हजार रुपयांची FOC अॅक्सेसरीज आहे.

Back to top button