पुढारी ऑनलाइन डेस्क : Heart Health मानवी शरीराला आवश्यक असणा-या घटकांमध्ये तेल हा एक महत्वाचा घटक आहे. आपल्या आहारामध्ये तेलाचा समावेश असणे आवश्यक असते. त्यामुळे शरीराचे पोषण होत असते. तसेच तेलाचा संबंध हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच जवळचा असतो. त्यामुळे आपल्याला आपण नेमके कोणते तेल खावे हा मोठा प्रश्न पडतो. सोयाबीनपासून ते खोब-यापर्यंत कोणते तेल आहारात उपयोगात आणायला हवे? याचा आपण थोडक्यात आढावा इथे घेणार आहोत.
Heart Health तेलाच्या जाहिरातींचा भूलभूलैय्या
मूळात सामान्य माणसाला हृदयाचे कार्य कसे चालते किंवा अन्य वैज्ञानिक गोष्टींची माहिती फारशी नसते. त्यामुळे लोकांच्या या अज्ञानाचा फायदा तेल कंपनीची जाहिरात करणारे घेतात. सर्वजण आपआपल्या तेलाची जाहिरात करतात. आमच्या तेलाच्या वापरामुळे हे अमुक फायदे होतात. तमूक धोका टळतो. परिणामी सर्वसामान्य माणूस फक्त भीतीपोटी गोंधळतो. जाहिरातींमधून सर्वसाधारणपणे भीतीच खूप पसरवली जाते. म्हणून तेलाच्या जाहिरातींच्या भूलभूलैय्यात अडकू नका.
Heart Health कोणते तेल खाणे खरेच फायदेशीर
जागतिकीकरणानंतर साधारणपणे 90 च्या दशकानंतर भारतीय आहारात पॅकिंगच्या तेलाचा समावेश झाला. त्यापूर्वी फक्त फूड इंडस्ट्रित किंवा खाद्यतेलाच्या गाड्या रेस्टॉरंटमध्येच पॅकिंगचे तेल वापरले जात असे. त्यातही पाम तेलाचा वाटा खूप मोठा होता. मात्र, पॅकिंगचे तेल येण्यापूर्वी साधारणपणे गावकुसावर तेली असायचे. घाणे चालायचे तेल काढले जायचे. लोक तेच तेल स्वयंपाकासाठी वापरत असे. त्यावेळी हृदयविकाराचे प्रमाण देखिल कमी होते. मग पॅकिंगचे तेल आल्यानंतर नेमके काय बदल झाले आणि हृदयविकाराचे धोके वाढले. हे पाहणे महत्वाचे आहे.
Heart Health पॅकिंगच्या तेलमधून रिफाइंड ऑइलचा प्रवेश
पॅकिंगच्या तेलमधून जाहिरातींच्या माध्यमातून रिफाइंड ऑइलचा प्रवेश आपल्या आहारात झाला. अलिकडील काळात 'राजीव दीक्षित' तसेच अनेक वेगवेगळ्या जाणकारांनी रिफाइंड ऑइल शरीराला का घातक आहे. हे कसे तयार होते. हे का बनवण्यात आले. याचे शरीरावर काय दुष्परिणाम होतात. याची बरीच मोठी तपशीलवार माहिती यु ट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. त्यानंतर याबाबत हळूहळू समाजात जागरूकता निर्माण होत आहे. मुळात रिफाइंड ऑइल हे अनेक केमिकल प्रक्रिया पार करून आपल्यापर्यंत येते. त्यामुळे कोणत्याही कंपनीचे आणि सोयाबीनपासून ते खोबरेल तेलापर्यंतचे कोणत्याही खाद्यबियांचे तेल हे रिफाइंड असेल तर ते शरीरासाठी घातकच असते.
Heart Health सूर्यफुलाचे, मोहरीचे, शेंगदाण्याचे की खोब-याचे नेमके कोणते तेल चांगले?
सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळे खाद्यतेल उपलब्ध आहे. त्यापैकी राइस ब्रॅन ऑइल हे खूप चांगले असून त्याने हृदय चांगले राहते, अशा जाहिरातींचा मोठा भडीमारा आपल्यावर होत आहे. आपण जाहिरातींच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करतो. तेव्हा आपला आहार कसा असावा आणि आहारात कोणते तेल असावे याबाबत जर आपण आपल्या ग्रंथांचा थोडा अभ्यास केला तर आपल्याला याचे उत्तर मिळते. निसर्गाने प्रत्येक प्रदेशाला वैशिष्ट्यपूर्ण बनवले आहे. त्या-त्या प्रदेशात उगवणा-या वनस्पती हे त्या प्रदेशातील राहणा-या प्राणीमात्रांच्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.
परिणामी आपले ग्रंथ आपल्याला कधीही अमूक हेच तेल चांगले असे सूचवत नाही. तर तुम्ही ज्या प्रदेशात राहता त्या प्रदेशातील ज्या वनस्पतींच्या बियांमधून जे तेल उत्पन्न होते ते तेल आरोग्यासाठी फायदेशीऱ असते. उदाहरणार्थ पंजाब, हरियाणा उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश या ठिकाणी थंडी मोठ्या प्रमाणात असते. परिणामी तिथे मोहरीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. या भागातील लोकांसाठी मोहरीचे तेल खाणे हेच फायदेशीर असते.
या उलट कोकणापासून पुढे दक्षिण भारतात केरळ, तामिळनाडूचा काही भाग हा नारळांच्या पीकासाठी उपयुक्त आहे. तिथे खोब-याचे प्रमाण जास्त असल्याने तिथे त्या लोकांनी नारळाच्या तेलाचा वापर आहारात केल्यास त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात भागात करडी आणि शेंगदाणे या पिकांसाठी भौगोलिक वातावरण चांगले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील खाद्य पदार्थात या दोन तेलांचा वापर असेल तर त्यांच्यासाठी ते सर्वोत्तम असेल. मात्र हे सर्व तेल रिफाइंड ऐवजी कोल्ड फिल्टर म्हणजे घाण्यात किंवा फक्त मशिनीतून डायरेक्ट काढलेले असावे. जेणेकरून ते फक्त तुमच्या हृदयालाच नाही तर अन्य गुडघे, कंबर अशा अवयवांना देखिल उपयुक्त असते. मग ते कोणत्याही कंपनीचे असो.
हे ही वाचा :