Diabetes and Refined flour : डायबेटिज दूर ठेवायचा आहे, तर मैद्याचे पदार्थ टाळाच; ‘या’ कारणांमुळे आरोग्याला हानिकारक

Diabetes and Refined flour : डायबेटिज दूर ठेवायचा आहे, तर मैद्याचे पदार्थ टाळाच; ‘या’ कारणांमुळे आरोग्याला हानिकारक

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : केक, ब्रेड, बिस्किट, पिज्झा, पराठा, तंदुर रोटी असे किती तरी पदार्थ आपण चवीने खातो. मैद्यापासून बनलेले हे पदार्थ नक्कीच टेस्टी असतातच; पण मैद्यापासून बनलेले पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात. ( Diabetes and Refined flour )   मैदा आरोग्याला हानिकारक आहे, हे आपल्याला माहिती असतानाही मैद्यापासून बनलेल्या पदार्थाचा भरणा आपल्या रोजच्या आहारात मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो. मैदा आरोग्यावर कशा प्रकारे वाईट परिणाम करतो, हे जाणून घेणे आवश्यक आहे. जेणे करून आपण मैद्याचे पदार्था खायचे कमी करू.

मैद्याला काही डॉक्टर 'व्हाईट पॉईजन' म्हणतात. मैदा बनवताना गव्हातील सर्व पौष्टिक घटक काढून टाकलेले असतात. त्यामुळे शरीराला आश्यकत खनिजं आणि व्हिटॅमिन्स मिळत नाहीत.

Diabetes and Refined flour :  मैद्याचे पदार्थ शुगरचे प्रमाण  वेगाने वाढवतात

प्रॅक्टो या ॲपवर डॉ. सिल्की महाजन यांनी या संदर्भात एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. मैद्याचे कोणतेही पदार्थ खाल्यानंतर रक्तातील शुगरचे प्रमाण फार वेगाने वाढते. मैद्याचा ग्लायसेमिक इंडेक्स फार जास्त असल्याने रक्तातील साखर फार वेगाने वाढते. त्यामुळे स्वादुपिंडाला तितक्या प्रमाणार इन्सुलिन निर्माण करावे लागते. आपण अगदीच क्वचित कधीतर मैदाचे पदार्थ खाल्ले तर स्वादुपिंड इन्सुलिनचे नियोजन नीट करू शकतेच पण सततच मैद्याचे प्रमाणे खाल्ले जात असतील, तर इन्सुलिन निर्मितीची प्रक्रिया कमी होत जाते आणि शेवटी तुम्हाला मधुमेह (डायबेटिज) होतो.

ही साखर (ग्लुकोज) शरीरातील प्रोटिनला चिकटते आणि त्यातून शरीरात सूज येते. याचा परिणाम म्हणून सांधेदुखी, हृदयविकार असे आजार होतात, असे डॉ. महाजन म्हणतात. मैद्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. त्यामुळे वजन वाढणे, रक्तदाब वाढणे, लठ्ठपणा असे परिणाम दिसू लागतात. मैद्याच्या पदार्थांमुळे भूकही जास्त लागते, त्यामुळे जास्त खाण्याकडे कल वाढतो.मैदा हा Acidic असतो. त्याचे वाईट परिणाम हाडांवरही होतात. शिवाय अपचानाची समस्याही सुरू होते.

पर्याय काय?

मैद्याचे पदार्थ पूर्ण बंद करणे हाच यावर चांगला पर्याय आहे. या ऐवजी पूर्ण गव्हाचे पीठ, ज्वारी, नाचणीचे पीठ यांपासून बनलेल्या पदार्थ्यांचा आहारात समावेश करा, असे डॉ. महाजन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news