fact check : WhatsApp वर आलेली माहिती खरी की खोटी, कशी ओळखाल? | पुढारी

fact check : WhatsApp वर आलेली माहिती खरी की खोटी, कशी ओळखाल?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या स्मार्टफोन प्रत्येक व्यक्तीचे पर्सनल डिव्हाईस बनले आहे. त्यामुळे या साधनाचा वापर कोणीही, कोठेही अगदी सहज करताना दिसतात. मोबाईल उपलब्ध झाल्याने सोशल मीडियाचा वापरही प्रचंड प्रमाणात वाढला आहे. व्हॉट्सॲप (Whats App) सहजरित्या वापरने शक्य असल्याने याचे वापरकर्तेही अधिक आहेत. त्यामुळे या समाजमाध्यमाचा वापर फेक न्यूज आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात असल्‍याचेही वारंवार निदर्शनास येत असते. निवडणूक, पक्ष, राजकीय व्यक्ती याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात चुकीची माहीती सोशल मीडियावर  पसरून सामाजिक शांतता भंग होऊ शकते त्यामुळे आपल्या समाज माध्यमांवरील कोणतीही माहीती खात्री शिवीय पुढे पाठवू नका.

अशा परिस्थितीत, आपल्या मोबाईलवर आलेले फोटो, व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग, टेक्स्ट मेसेज आणि इतर सामग्रीची काेणतीही पडताळणी करत नाही. तसेच पुढे पाठवतो; पण खात्री न करता पाठवलेली ही माहिती क्षणार्धात मोठ्या प्रमाणात पसरते. चुकीची माहिती पसरून समाजात गैरसमाजही निर्माण होतात. त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती पुढे फॉडवर्ड करण्यापूर्वी ती जाणीवपूर्वक तपासली पाहिजे. व्हॉट्स ॲपवरील माहिती तपासल्यानंतरच फॉडवर्ड करा. जेणेकरून चुकीची माहिती पुढे पसरली जाणार नाही .
व्हॉट्स ॲपवर ( Whats App ) आलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी देशात अनेक तपासणी संस्था आहेत. या माहितीची इंटरनॅशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN) द्वारे तपासणी केली जाते. ज्याद्वारे आपल्याला व्हॉट्स ॲपवर  आलेली माहीती खरी आहे की खोटी हे समजू शकते.

व्हॉट्सॲपवर फॅक्ट-चेकिंगसाठी हे आहेत पर्याय

एएफपी (91 95999 73984) : एजन्स फ्रान्स प्रेस (AFP) ही एक फ्रेंच खाजगी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आहे. AFP फॅक्ट चेकवर हे मजकूर, संदेश, व्हिडीओ आणि फोटो तपासण्यासाठी डिझाईन केलेले आहे. हे इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांसाठी वापरले जाते.

बूम (91 77009-06111 / +91 77009-06588) : AFP प्रमाणे, BOOM हे एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा उद्देश चुकीच्या माहितीशी लढा देत इंटरनेट अधिक सुरक्षित करणे हा आहे. हे इंग्रजी, हिंदी आणि बंगाली भाषेतही  काम करते. याच्या मदतीने, वापरकर्ते त्यांना मिळालेले फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकूर तपासू शकतात. BOOM च्या वृत्तपत्राचे सदस्यत्व देखील घेऊ शकता.

फॅक्ट क्रेसेंडो(+91 90490 53770): Fact Crescendo(फॅक्ट क्रेसेंडो) हे भारतात गुंतलेल्या फॅक्ट-चेकर्सपैकी एक आहे. यामध्ये हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. नऊ भाषांमधील माहिती यामध्ये तपासली जाते. यामध्ये बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, मराठी, ओडिया आणि तमिळ या भाषांचा समावेश आहे. वापरकर्त्यांच्या माहितीची पडताळणी करण्याव्यतिरिक्त, ते COVID-19 शी संबंधित खरी माहिती देखील देते.

फॅक्टली(+91 92470 52470) : फॅक्टलीद्वारे (FACTLY) कोणताही लेख, व्हिडिओ आणि इतर सामग्रीची पडताळणी केली जाऊ शकते. फक्त इंग्रजीमधीलच माहिती यावर तपासता येणार येऊ शकते.

न्यूजचेकर (+91 99994 99044) : न्यूजचेकर(Newschecker) हे इंग्रजी, गुजराती, हिंदी, मराठी, पंजाबी आणि उर्दूसह 9 भाषांमध्ये काम करते. याद्वारे, वापरकर्ते त्यांना मिळालेले संशयास्पद संदेश, फोटो आणि व्हिडिओची पडताळणी करू शकतात.

हेही वाचलंत का ?

Back to top button