YouTube Users : भारतीयांची युट्यूब मार्फत ६,८०० कोटींची कमाई | पुढारी

YouTube Users : भारतीयांची युट्यूब मार्फत ६,८०० कोटींची कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : युट्यूब (YouTube) निर्मात्यांनी २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला ६,८०० कोटी रूपयांचा लाभ मिळवून देत, ६,८३,९०० इतके पूर्णवेळ रोजगार निर्माण केल्याची माहिती एका अहवालात दिली आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स कंपनीने YouTube चा भारतातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकवर झालेल्या प्रभावाचा मूल्यांकन अभ्यास या विषयावरील एका अहवालात ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स कंपनीने‘A Platform for Indian Opportunity: Assessing the Economic, Societal and Cultural Impact of YouTube in India’, या प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील युट्यूबच्या निर्मात्यांची संख्या वाढल्यामुळे, भारताच्या आर्थिक उत्पनामध्येही वाढ झाली आहे. या युट्यूब चॅनेल्सनी जीडीपीमध्ये ६,८०० कोटी रूपयांची वाढ नोंदवली आहे. तसेच युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून ६,८३,९०० पूर्णवेळ नोकऱ्या निर्माण केल्याचेही हा अहवाल सांगतो.

या अभ्यासामध्ये युट्यूब चॅनेल्सवरील नफ्यामध्ये चालित जाहिरात महसूल, इतर संबंधित महसूल, गैर-जाहिराती महसूल, ऑफ-प्लॅटफॉर्म महसूल तसेच YouTube निर्मात्यांना मिळालेले उत्पन्न, तसेच जाहिरातीतून मिळालेल्या फायद्याचाही समावेश करण्यात आला आहे. युट्यूब चॅनेल्स निर्मात्यांना कमाई व्यतीरिक्त थेट प्रक्षेपण, जागतिक चाहता वर्ग निर्मिती, ब्रँड भागिदारी असे कमाईचे इतर मार्गही खुले करतो.

भारतामध्ये १ लाखापेक्षा जास्त सब्स्क्रायबर असणाऱ्या युट्यूब चॅनेलची संख्या २०२० मध्ये ४०,००० इतकी होती, जी आज वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिक झाली आहे. गेल्यावर्षी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, देशात ४४.८ कोटी युट्युब वापरकर्ते आहेत. तसेच ५३ कोटी व्हॉट्सअॅप, ४१ कोटी फेसबुक, २१ कोटी इंन्टाग्राम आणि १.७५ कोटी ट्वीटर वापरकर्ते असल्याचेही भारतात सरकारने नमूद केले आहे.

 व्हिडिओ पाहा : वादळाची चाहूल | Pudhari Podcast

 

Back to top button