सिंगल चार्ज मध्ये 150 किमी पर्यंत जबरदस्त रेंज देणाऱ्या दमदार ई बाईक्स..

Revolt RV 400
Revolt RV 400
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

इलेक्ट्रिक स्कूटर्सनंतर आता देशामध्ये इलेक्ट्रिक बाइक्सचीही जबरदस्त मागणी होताना दिसत आहे. या इलेक्ट्रिक बाइक दिसायला तर सामान्य मोटरसायकलप्राणेच दिसतात, पण यांच्या वापरासाठी येणारा खर्च पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी असतो. देशात काही दिवसांपासून पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडत आहेत, अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केलीये.

त्यामुळे अनेक वाहनचालकांचा कल पर्यायी अर्थात इलेक्ट्रिक बाइक खरेदीकडे वाढलाय. शिवाय अनेक भारतीय कंपन्याही इलेक्ट्रिक बाइक्सच्या सेगमेंटमध्ये पुढे आल्या आहेत. दमदार रेंज आणि हायटेक फीचर्स असलेल्या अनेक मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाइक्स सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच दमदार ड्रायव्हिंग रेंज आणि लेटेस्ट फीचर्स असलेल्या शानदार मेड इन इंडिया बाइक्सबाबत सांगणार आहोत.

रिवोल्ट RV 400

ही बाइक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर जवळपास १५० किलोमीटरपर्यंत दमदार ड्रायव्हिंग रेंज देते, तर 85 किमी प्रति तास इतका या बाइकचा टॉप स्पीड आहे.या बाइक ची किंमत १ लाख१६ हजार आहे इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड्स या बाइकमध्ये दिले आहेत. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये MyRevolt मोबाइल अॅप कनेक्टिविटी, जिओफेंसिंग, कस्टामाइज्ड एग्जॉस्ट साउंड, बॅटरी स्टेटस, एलईडी हेडलँप, एलईडी टेललाइट्स आणि पूर्ण डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.

कोमाकी रेंजर

ही बाईक यावर्षी 24 जानेवारी रोजी लॉन्च करण्यात आली आहे. कोमाकी रेंजरही देशातील पहिली इलेक्ट्रिक क्रूझर बाईक आहे जी एकदा चार्जिंग केल्यावर 220 किमीची रेंज देते. या बाईकच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर एक्स-शोरूम किंमत 1 लाख 68 हजार रुपये आहे.

जॉय ई-बाईक मॉन्स्टर

इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणाऱ्यांसाठी जॉय ई-बाईक मॉन्स्टर बाईक देखील उत्तम आहे, त्याची किंमत 1 लाख रुपये आहे. या बाइक च्या बॅटरीची रेंज 75 किमी पर्यंत आहे, परंतु तिचा टॉप स्पीड फक्त 25 किमी प्रति तास आहे. ही बाईक साडेचार तासात फुल चार्ज होते.

रिवोल्ट RV 300 –

रिव्हॉल्टची ही दुसरी इलेक्ट्रिक बाइक आहे आणि तिची एक्स-शोरूम किंमत 1 लाख रुपये आहे. ही बाइक एका चार्जमध्ये 180 किमीची रेंज देते. फुल चार्जिंग होण्यासाठी या बाइक ला 4 तास लागतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news