Constable Recruitment : १२ वी पास उमेदवारांना संधी, CISF मध्ये ११४९ पदांसाठी भरती | पुढारी

Constable Recruitment : १२ वी पास उमेदवारांना संधी, CISF मध्ये ११४९ पदांसाठी भरती

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) कॉन्स्टेबल (CONSTABLE/FIRE) पदांच्या एकूण ११४९ जागांसाठी भरती केली जात आहे. त्यासाठी सीआयएसएफने अधिसूचना जारी केली आहे. यासाठी आज २९ जानेवारी ते ४ मार्च दरम्यान अर्ज करण्यासाठी मुदत आहे. या पदासांठी २१,७०० – ६९,१०० रुपये अशी वेतनश्रेणी आहे. शारीरिक, लेखी आणि वैद्यकीय चाचणी केल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासांठी केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून ६३ आणि नक्षलग्रस्त भागांतून ७ पदे भरली जाणार आहेत. तर कर्नाटकासाठी ३४ पदे रिक्त आहे.

वयोमर्यादा : या पदांसाठी १८-२३ वर्षे अशी वयोमर्यादा आहे.

शैक्षणिक पात्रता : उमेदवार विज्ञान विषयासह मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून १२वी उत्तीर्ण असावा.

Physical Standards : उंची -१७० सेमी

छाती -८०-८५ सेमी (Minimum expansion 5 Cms)

अधिक माहितीसाठी सीआयएसएफच्या www.cisfrectt.in या वेबसाइटवर संपर्क साधावा.

CISF Constable Recruitment : अर्ज कसा करावा

  • पहिल्यांदा उमेदवाराने सीआयएसएफच्या www.cisfrectt.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
  • होम पेजवर Recruitment सेक्शनवर क्लिक करा.
  • भरतीची संबंधित सर्व माहिती वाचून झाल्यानंतर नोंदणी करावी.
  • आता आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करा.
  • मागितलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क भरून सबमिट बटनावर क्लिक करा.
  • अर्ज डाउनलोड करुन त्यांची प्रिंट काढू शकता.

Back to top button