जळगाव : रेल्वे कंत्राटी कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

जळगाव : रेल्वे कंत्राटी कामगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा :  रेल्वे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मनमाड ते भुसावळ मधील स्थानकाची पाहणी करत भुसावळला आले असता या ठिकाणी रेल्वे हेरिटेज व रनिंग स्टॉपच्या इमारतीचं उद्घाटन करीत असतानाच रेल्वे यार्ड मध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या कंत्राटी कामगाराचे दोन्ही पाय कापले गेली. त्याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. अखेर एका रिक्षाचालकाने जखमी कामगाराला रुग्‍णालयात दाखल करण्‍यास मदत केली.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी मनमाड-भुसावळ विभागाची  पाहणी केली. भुसावळ येथे रेल्वे रनिंग बिल्डींग व रेल्वे हेरिटेज उद्यानाचे उद्घाटन यांच्या हस्ते रात्री 9 वाजेला झाले. महाव्यवस्थापक हे डीआरएम कार्यलयात आमदार, खासदार व अधिकरी याच्या समेवत चर्चा करीत असताना रेल्वे यार्ड मधील केबिन नंबर 10 जवळ ठेकेदारी मध्ये काम करणारा कामगार राजनचे दोन्ही पाय रेल्वेखाली कापले गेले. यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. परिसरातील एका रिक्षाचालकाने जखमी कामगाराला रुग्‍णालयात दाखल करण्‍यास मदत केली.

या घटनेमुळे ठेकेदारी मध्ये काम करणारे कामगारांना कोणती सुरक्षा उपकरणे दिली जातात हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्‍यान,  एक तासाहून अधिक वेळ होऊनही महाव्यवस्थापक पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. त्‍यामूळे सर्व पत्रकारांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button