WhatsApp मधील ९ चुका नेऊ शकतात थेट जेलमध्ये ! | पुढारी

WhatsApp मधील ९ चुका नेऊ शकतात थेट जेलमध्ये !

पुढारी ऑनलाईन डेस्क

आज सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय कोणतं माध्यम असेल तर ते म्हणजे फेसबुकची मालकी असेलेले व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅप  युझर्सना नवनवीन नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने हल्ली त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे, पण व्हॉट्सअ‍ॅपच्या काही चूका (WhatsApp Mistake) आपल्याला जेलची हवा घडवून आणू शकतात.
जर तुम्हाला जेलची हवा खायची नसेल तर या चूका कोणत्या आहेत याबद्दल माहित असणे गरजेचं आहे.  पाहूया व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या चूका’ नेमक्या काय आहेत. 
सोशल मीडियामध्ये संवाद साधण्यासाठी अधिकाधिक मागणी असलेले माध्यम म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप. व्हॉट्सअ‍ॅपच्या अशा काही चूका आहेत ज्या तूम्ही जाणीवपूर्वक आणि अजाणतेने जरी  केल्या तर तूम्हाला जेलची हवा खाऊ शकता. 
‘या आहेत चूका’

1) जर तुम्ही एखाद्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमिन असाल आणि तुम्ही किंवा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील केणत्याही सदस्याने बेकायदेशीर बाब शेअर केली असेल तर तुम्हाला जेलची हवा मिळू शकते.

2) चूकनही कधी ही चूक करू नका. अश्लील क्लिप, चाइल्ड पोर्न, इमेज संदर्भात काही शेअर केल्यास कडक कारवाई होवू शकते.

3) एखाद्या महिलेने आपल्याला व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीने अश्लील माहिती पाठवली आहे अशी तक्रार केल्यास त्याला अटक होवू शकते

4) व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्याही सदस्याने मॉर्फेड फोटोज आणि छेडछाड केलेले व्हिडिओ शेअर केल्यास अटक होते.

5) धर्म आणि पुजा या धार्मिक बाबींना धक्का बसतील असा  कोणताही फोटो आणि छेडछाड केलेले व्हिडिओ शेअर केल्यास अटक होवू शकते.

6) जर का तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप इतर कोणाच्या नावाने काढून वापरत असाल तर तो गुन्हा आहे. ही बाब महागत पडू शकते.

8) आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर करणे हे सुध्दा महागात तुम्हाला पडेल .

9 ) व्हॉट्सअ‍ॅपचा वापर जर ड्रग्ज किंवा इतर अन्य प्रतिबंधित वस्तु, पदार्थ विकण्यासाठी जर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर एखादी व्यक्ती करत असेल तर हे लक्षात आल्यास त्या व्यक्तीला अटक होवू शकते.

हेही वाचा; 

Back to top button