

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी एका दलिक युवकाचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ माजली. मात्र, या व्यक्तीसंबंधी काही माहिती समोर आली आहे. या मृत व्यक्तीचं मान लखबीर सिंह असून तो तरनतारन येथे राहणारा आहे. या व्यक्तीचा राजकीय पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशीही माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाबद्दल समोर आलेली माहिती अशी की, ३५ वर्षीय लखबीर सिंहला ३ मुली असून तो मागील काळापासून दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. पण, त्याच्यासोबत त्याचं कुटुंब राहत नाही. या प्रकरणात सेनापती पोलीस ठाण्यातून काही व्हिडीओ मिळाले आहेत. त्याच्या आधारे तपास सुरू आहे.
लखबीर सिंहची हत्या करून त्यावा बॅरिकेडिंगला टांगण्यात आलेलं होतं. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून तो मृतदेह उतरविण्यात आला. त्यानंतर तो शहर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. लखबीर सिंहत्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे आढळून आलेले आहे.
माध्यमांतून आलेल्या माहितीनुसार शिखांना या लखबीर सिंहची निर्घृण हत्या केली आहे. कारण, त्याचा मानेवर आणि शरीराच्या अन्य ठिकाणी वार केल्याचे दिसून आले. ही हत्या केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाच्या मुख्य तंबूजवळ बॅरिकेड्सला त्याचा मृतदेह अडकविण्यात आला. असं सांगितलं जात आहे की, शिखांच्या पवित्र धर्मग्रंथ असणाऱ्या 'ग्रंथ साहिबा'चा अपमान करण्याचा आरोप लखबीर सिंहवर होता. पण, शेतकरी आंदोलन याचा आणि या प्रकरणाचा काही संबंध नाही, असंही सांगितलं जात आहे.