छत्तीसगड : दुर्गा विसर्जनाच्या शोभायात्रेत सुसाट गाडी घुसवून भर रस्त्यात १६ जणांना चिरडले - पुढारी

छत्तीसगड : दुर्गा विसर्जनाच्या शोभायात्रेत सुसाट गाडी घुसवून भर रस्त्यात १६ जणांना चिरडले

रायपूर; पुढारी ऑनलाईन

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडल्याची संतापजनक घटना ताजी असतानाच छत्तीसगडमधून आता तसाच प्रकार समोर आला आहे. राज्यातील जशपूर जिल्ह्यात सुसाट गाडी घुसवून चिरडल्याने ४ जणांचा बळी गेला आहे, तर १६ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात राज्यातील जशपूर जिल्ह्यात झाला. दुर्गा विसर्जनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये कारखाली चिरडलेले भाविक सहभागी झाले होते. या अपघातात आतापर्यंत ४ जणांचा चिरडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

जखमींना पाथळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार-मरून रंगाच्या महिंद्रा जायलो कारने भाविकांना चिरडले. या गाडीला मध्य प्रदेश पासिंगची नंबर प्लेट होती. अपघातानंतर कार सुखरापाराच्या दिशेने सुसाट निघून गेली.

ब्लॉक वैद्यकीय अधिकारी जेम्स मिन्झ यांनी वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, जखमींपैकी दोन जणांना फ्रॅक्चरमुळे दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button