Earthquake in Andaman Sea
Latest
Earthquake in Andaman Sea: अंदमानमध्ये ४.३ रिश्टरचा भूकंप
पुढारी ऑनलाईन डेस्क: अंदमान समुद्रात ४.३ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंप झाला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अंदमान समुद्रात १० किमी खोलीवर होता. आज रविवारी (दि.३ सप्टें) दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी हा भूकंप झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली (Earthquake in Andaman Sea) आहे.
Earthquake in Andaman Sea: ऑगस्टमध्ये ३ वेळा भूकंपाचे धक्के
यापूर्वी गेल्या महिन्यात १८ ऑगस्ट रोजी अंदमान निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील अंदमान समुद्रात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूंकप झाला होता. त्यापूर्वी १० ऑगस्टच्या मध्यरात्री पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटाच्या ११२ किमी SSE अंतरावर देखील ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप Earthquake नोंदवला गेला. तर २ ऑगस्टला पहाटे ५ च्या सुमारास अंदमान आणि निकोबार या बेटांना ५.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली होती.

