Earthquake in Andaman Sea: अंदमान समुद्रात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप | पुढारी

Earthquake in Andaman Sea: अंदमान समुद्रात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूकंप

पुढारी ऑनलाईन डेस्क: अंदमान निकोबार बेटाच्या दक्षिणेकडील अंदमान समुद्रात ४.३ रिश्टर तीव्रतेचा भूंकप झाला. आज दुपारी (Earthquake in Andaman Sea)  १२.०७ वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया‘ने दिले आहे.

यापूर्वी शुक्रवारी ११ ऑगस्टच्या मध्यरात्री  पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार बेटाच्या ११२ किमी अंतरावर अति आग्नेयला ४.३ तीव्रतेचा भूकंप नोंदवला होता. तसेच याआधी देखील सोमवारी (दि. ७ ऑगस्ट) अंदमान आणि निकोबार बेटावर ४.५ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला (Earthquake in Andaman Sea)असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून दिली होती.

हेही वाचा:

Back to top button