मलेशिया हा देश अतिशय प्रगत देश असल्याने या देशात विद्यापीठातील अभ्यासक्रमात बाबासाहेबांच्या साहित्यसंपदेचा समावेश व्हावा ही अनेक आंबेडकरी अनुयायांची इच्छा होती. या वर्षीचे 'जागतिक आंबेडकरी सम्मेलन' मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने चिमूर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. भुपेश पाटील यांनी मलेशिया देशाच्या केंद्रीय सहकार व उद्योग राज्यमंत्री सरसती कंडासामी, भारतीय दुतावासातील राजदूत व उच्च अधिकारी रम्या हिरानय्या तसेच मलेशियन औद्योगिक व व्यापार संघटनेचे उपाध्यक्ष एस एम गोबल यांची भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा अध्यासन सुरु करण्याबाबत तसेच बाबासाहेबांची जयंती ही मलेशिया देशात शासकीय स्तरावर साजरी करण्याबाबत निवेदन देऊन याबाबत सादरीकरण सादर केले.