

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) हिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दिशा पटानी जेव्हा केव्हाही तिच्या इन्स्टाग्रामवर एखादा फोटो किंवा व्हिडिओ शेअर करते तेव्हा तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर येतो. तिच्या हॉट फोटोंसोबतच जीममध्ये घाम गाळतानाच्या पोस्टलाही चांगलीच पसंती मिळते आहे. आता नुकतेच दिशाने इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा काही हॉट फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे युजर्सना घाम फुटला आहे. कट आऊट ड्रेसमधील दिशाच्या लेटेस्ट फोटोंनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Disha Patani )
दिशा पांढर्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट दिसत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. केवळ चाहतेच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटीही तिचे कौतुक करत आहेत. याआधीही दिशाने इन्स्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटो शेअर करून आपल्या बोल्डनेसने सर्वांना आश्चर्यचकित केले होते.
दिशा नेहमीच आपली टोन्ड फिगर दाखवायला कमी पडत नाही. फिटनेस अॅडिक्ट दिशाने पांढर्या कट-आउट बॉडी-हगिंग सिल्हूटमध्ये स्वतःचा एक हॉट फोटो शेअर केला. इन्स्टाग्रामवरील एका फोटोमध्ये दिशा स्पष्ट दिसत असून दुसऱ्या फोटोमध्ये ती अस्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती बोल्ड पोज देताना दिसतेय. ती टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
दिशा लवकरच जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि तारा सुतारिया यांच्यासोबत 'एक व्हिलन २' मध्ये दिसणार आहे. ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योध्दा'मध्येही दिसणार आहे. याशिवाय दिशा पटानी लवकरच प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. तसेच दिशा एकता कपूरच्या 'कतीना' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे.