Dinesh Karthik | दिनेश कार्तिक IPL मधून निवृत्ती घेणार; आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा करणार?

Dinesh Karthik | दिनेश कार्तिक IPL मधून निवृत्ती घेणार; आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा करणार?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 2024 हंगामाची तयारी करत आहे. यंदाच्या आयपीएलनंतर दिनेश आंतरराष्ट्रीय निवृत्तीचा निर्णय घेणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून खेळणारा दिनेश सध्या 38 वर्षीचा आहे. दिनेश कार्तिक 2008 पासून आयपीएलच्या सर्व 16 हंगामात खेळला आहे.  बीसीसीआयच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, '2024 मध्ये दिनेश कार्तिकचा शेवटचा आयपीएल हंगाम खेळताना आपल्याला पहायला मिळण्याची शक्यता आहे. दिनेश आयपीएलनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्तीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. (Dinesh Karthik)

अर्ध्या डझन संघांकडून खेळला दिनेश

आयपीएलमधील अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाजांपैकी एक असलेल्या कार्तिकने आयपीएलमध्ये सहा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळल्यानंतर तो 2011 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) मध्ये सामील झाला. यानंतर मुंबई इंडियन्ससाठी पुढील दोन हंगाम खेळल्यानंतर, तो 2014 मध्ये 12.5 कोटी रुपयांच्या मोठ्या रकमेसाठी दिल्लीत परतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला 2015 मध्ये 10.5 कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले होते. तो 2016 आणि 2017 मध्ये गुजरातकडून खेळला आणि त्यानंतर चार हंगामांसाठी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता.

T-20 क्रिकेटचा फिनिशर

दिनेशच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाइट रायडर्सने 2018 मध्ये आयपीएल प्ले-ऑफ गाठले होते. तर 2019 मध्ये संघाने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळविले. आयपीएल 2022 च्यापूर्वी कार्तिकला कोलकताने दिनेशला करारातून मुक्त केले. यानंतर त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने 5.5 कोटी रुपयांना विकत घेतले. मुख्यतः फिनिशरची भूमिका बजावत त्याने 2022 मध्ये RCB साठी चमकदार कामगिरी केली.

कार्तिकने 2022 मध्ये 16 सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने आणि 183.33 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या आणि संघाला प्ले-ऑफमध्ये नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर कार्तिकने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ICC T-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघात स्थान मिळवले. पण तो अपेक्षेप्रमाणे खेळू शकला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभवा सामोरे जावे लागले होते. (Dinesh Karthik)

दिनेश कार्तिकची कारकीर्द

सध्या खेळाडू म्हणून क्रिकेटपासून दूर असलेल्या दिनेशने समालोचक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दिनेशने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतही चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. कार्तिकने 26 कसोटी खेळल्या आहेत. यात त्याने 1025 धावा केल्या. यासह त्याने 57 झेल घेण्यासोबतच त्याने सहा यष्टिचीतही केली. 2018 मध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली होती.

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 2004 ते 2019 दरम्यान 94 सामन्यांमध्ये 1752 धावा केल्या. यामध्ये 64 झेल आणि सात स्टंपिंग केले. 2006 टी-20 मध्ये पदार्पण केलेल्या कार्तिकने 2022 मध्ये बांगलादेशविरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याने 60 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 686 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 30 झेल आणि आठ स्टंपिंग केले. नुकताच नवी मुंबई येथे झालेल्या डीवाय पाटील टी-२० चषकातही तो सहभागी झाला होता.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news