नृत्य शिक्षकाने काढले अश्लिल व्हिडिओ; ब्लॅकमेलिंग करून उकळले पैसे

नृत्य शिक्षकाने काढले अश्लिल व्हिडिओ; ब्लॅकमेलिंग करून उकळले पैसे
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नृत्य शिकविण्याच्य बहाण्याने अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांचे अश्लिल व्हिडिओ काढल्याप्रकरणी उत्तरप्रदेशातील एका नृत्य शिक्षकाला अटक केली आहे.गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या शिक्षकांची एका अल्पवयीन मुलीच्या आईने चांगलीच पोलखोल केली.

मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लिल व्हिडिओ बनवून तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. एका मुलीला असेच ब्लॅकमेल करत असताना तिने आईच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करत केले. पैसे कुठे गेले याचा शोध घेतला असता सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. हा खुलासा इतका धक्कादायक होता की, संबधित शिक्षकाने १४ अश्लिल व्हिडिओ काढले होते.

एका मुलीच्या आईच्या बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाल्याची तक्रार आईने पोलिसांत नोंदवली. गुन्हे शाखेच्या सायबर सेलने याचा तपास केला असता या प्रकरणाचा उलघडा झाला. तरुणींना ब्लॅकमेल करणारा डान्स टीचर आर्यन सोनी उर्फ ​​हिमांशू सोनी याला गोविंद नगर पोलिसांनी अटक केली असून निरीक्षक रोहित तिवारी अधिक तपास करत आहेत.

आर्यन सोनी हा दाबौली येथील अर्बन डान्स अॅकॅडमी या नावाने डान्स क्लासेस चालवत होता. त्याने काही तीन अल्पवयीन मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे लैंगिक शोषण केले. त्याने या मुलींचे अश्लिल व्हिडिओही बनवले होते. हे सर्व व्हिडिओ पोलिसांना त्याच्या मोबाइलमध्ये आढळले. पोलिसांनी आर्यनला अटक केली असून त्याला गोपनीयरित्या लॉक अपमध्ये नेले.

त्यानंतर त्याला माध्यमांमासून लांब ठेवत कोर्टात हजर केले. पोलिसांच्या या गोपनीयतेबद्दल गोविंद नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रोहित तिवारी म्हणाले, 'मुलींच्या पालकांना त्यांची ओळख लपवायची होती. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये ३७६, ३७७, ३८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित युवकाने काढलेले सर्व व्हिडिओ जप्त केले असून अधिक तपास सुरू आहे.'

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news