

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा
देशातील गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर ( Commercial LPG cylinder ) ग्राहकांना नवीन वर्षाच्या सुरूवातील मोठा दिलासा दिला आहे.कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये १०२.५० रुपयांची कपात केली आहे. नवीन दर आज, १ जानेवारीपासून लागू करण्यात आले आहेत. या कपातीनंतर रेस्टारंट व्यावसायिकांसह छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार १९ किलोग्रॅम वजनी व्यावसायिक सिलेंडरची किंमत राजधानी दिल्लीत आता १९८.५० रूपये झाली आहे गेल्या महिन्यात १ डिसेंबरला एलपीजीच्या व्यावसायिक सिलेंडरचे दर १०० रूपयांनी वाढवण्यात आले होती. यानंतर सिलेंडरची किंमत वाढून २ हजार १०१ पर्यंत पोहचली होती. २०१२-१३ नंतर व्यावसायिक सिलेंडरचे दरांमध्ये ही सर्वात मोठी वाढ होती. पंरतु, गॅस कंपन्यांकडून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची कपात करण्यात आलेली नाही. १४.२ किलोग्रॅम, ५ किलोग्रॅम तसेच १० किलोग्रॅम सिलेंडरचे दर हे पूर्वीप्रमाणेच आहे.
गेल्यावर्षी १ नोव्हेंबरला १९ किलोग्रॅम सिलेंडरची किंमत २६६ रूपयांनी वाढवण्यात आली होत.यानंतर या सिलेंडरचे दर २०००.५० रूपयांवर पोहचले होते.दर राज्यांमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एलपीजी चे दरांचा आढावा घेतला जातो. गेल्यावर्षी १ ऑक्टोबर ला व्यावसायिक किंमती ४३ रूपयांनी वाढवण्यात आले होते. ६ ऑक्टोबर ला यात अडीच रूपयांनी कपात करण्यात आली होती.
हेही वाचलं का?