

पुढारी ऑनलाईन डेस्क
खेळ कोणाताही असो प्रतिभावंत खेळाडू आपली खेळालाच नवा उंचीवर नेतो. खेळत असताना तो स्वत:ला सिद्ध करतो. कामगिरी चांगली होते तेव्हा सारेच डोक्यावर घेतात. खराब कामगिरीनंतर चाहते नाराजही होतात. असा अनेक चढउतारांचा सामना करत कारर्कीद संपण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येक खेळाडू वाटतं की निरोपाचा सामना हा स्मरणीय व्हावा. अशीच भावना टी20 क्रिकेटचा 'किंग' अशी ओळख निर्माण केलेल्या ख्रिस गेल ( Chris Gayle ) याची होती; पण त्याचा स्वप्नभंग झाला आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने त्याच्याबाबत घेतला निर्णय हा जगभरातील क्रिकेटप्रेमींना व्यथित करणारा ठरणार आहे.
मागील दशकात टी २० सामन्यांनी क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला. जगभरातील टी २० लोकप्रिय करण्यात सिंहाचा वाटा असणारा आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ, अशी आपली ओळख निर्माण केलेला ख्रिस गेल ( Chris Gayle ) याचे नाव अग्रस्थानी आहे.
मागील काही दिवस ख्रिस गेल हा फॉर्ममध्ये नव्हता. त्यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र आपला निरोपाचा सामना हा वेस्ट इंडिजमध्ये व्हावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली होती. लवकर आर्यलंड आणि इंग्लंड हे दोन्ही संघ वेस्ट इंडिज दौर्यावर येणारा आहेत. यावेळी वेस्ट इंडिज संघात आपली निवड होईल, अशी त्याला खात्री होती. मात्र वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने केलेल्या संघ निवडीत गेल याला स्थान दिलेली नाही.
४२ वर्षीय गेल याला आँर्यलंडविरोधातील किंगस्टोनमधील साबिना पार्क या घराच्या मैदानावर होणार्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारायची होती. मात्र त्याची संघातच निवड झाली नसल्याने त्याचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. टी २० क्रिकेटमध्ये अतुलनीय योगदान देणार्या या खेळाडूसाठी निरोपाचा सामनाच होणार नाही का, असा सवाल आता क्रिकेटप्रेमीतून होणार आहे.
जैमिका येथील गेल हा मागील एक दशकाहून अधिक काळ क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. त्यामुळे याचा निवृत्तीचा सामना स्मरणीय होण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करु, असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाचे प्रमुख रिकी स्केरिट यांनी सांगितले. तसेच त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्यासाठी निरोपाचा सामना होणारच नाही, अशा सर्व अफवा आहेत, असा दावाही
त्यांनी केला. गेल याचा निरोपाचा सामना कसा होईल, यासंदर्भात आम्ही निर्णय अद्याप निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमंस यांनी आर्यलंड आणि इंग्लंड विरोधातील मालिकेत कर्णधार पोलार्ड याच्यसह उपकर्णधार शाई होप याच्यावर वनडेची जबाबदारी सोपवली आहे. तर टी २० संघाचा उपकर्णधार
म्हणून निकोलस पूरन याला संधी दिली आहे.
हेही वाचलं का ?