चीनची लोकसंख्या ६० वर्षांत प्रथमच घटली, लवकरच मिरवणार ‘वृद्धांचा देश’ बिरुद!

चीनची लोकसंख्या ६० वर्षांत प्रथमच घटली, लवकरच मिरवणार ‘वृद्धांचा देश’ बिरुद!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वाधिक लोकसंख्‍येचा देश, असे बिरुद मिरवणार्‍या चीनची लोकसंख्‍या ६० वर्षांमध्‍ये प्रथमच घटली असल्‍याचे निदर्शना आले आहे. घटत्‍या लोकसंख्‍येमुळे जगातील सर्वाधिक वृद्धांचा देश होण्‍याच्‍या मार्गावर चीन आहे. जन्‍मदर कमी झाल्‍याने या देशाला नवीन सामाजिक समस्‍यांचाही सामना करावा लागणार आहे. ( China Population)

२०३० पासून चीनची लोकसंख्‍येत उतरणील लागेल, असा अंदाज संयुक्‍त राष्‍ट्रांनी २०२१ मध्‍ये व्‍यक्‍त केला होता. मात्र सलग पाच वर्ष चीनमधील लोकसंख्‍यावाढीचा दर हा कमी नोंदला गेला आहे. तर  मृत्‍यूदर वाढला आहे. लोकसंख्‍येचे संतुलन बिघडल्‍याने चीनला आर्थिक व सामाजिक समस्‍यांना सामोर जावे लागणार आहे. तसेच कमी संख्‍येने असणार्‍या तरुणाईला काम देवून देशाचा विकासाचा टक्‍का अबाधित ठेवण्‍याचे आव्‍हानही सरकारसमोर असणार आहे.

China Population : तब्‍बल ४५ वर्षांनंतर सर्वाधिक मृत्‍यूदर

चीनमधील सांख्‍यिकी विभागाने जाहीर केलेल्‍या आकडेवारीनुसार, २००० ते २०१०मध्ये चीनमधील लोकसंख्यावाढीचा दर ०.५७ टक्के होता. गेल्या दहा वर्षांतील लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर ०.५३ टक्के असून, लोकसंख्यावाढीचा हा १९५०पासूनचा सर्वांत कमी दर नोंदला गेला होता. डिसेंबर २०२२ मध्‍ये देशाची लोकसंख्‍या १,४११७५ अब्‍ज आहे. २०२१ मध्‍ये चीनमधील जन्‍मदर १००० लोकांमध्‍ये ७.५२ मुलांचा होता. मात्र मागील वर्षी म्‍हणजे २०२२ मध्‍ये देशातील जन्‍मदर  १००० नागरिकांमागे ६.७७ मुलांपर्यंत कमी झाला आहे.  मागील वर्षी दहा लाख मुले कमी जन्‍माला आहे. कोरोना महामारीमुळे १९७६ नंतर चीनमध्‍ये प्रथमच मृत्‍यूदराचे प्रमाण वाढल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. २०२२ मध्‍ये चीनमध्‍ये ७.३७ टक्‍के मृत्‍यूदर नोंदवला गेला आहे.

China Population : 'एक अपत्‍य' योजनेचा परिणाम

मागील काहीवर्ष चीनमध्‍ये अत्‍यंत कठोरपणे लोकसंख्‍या नियंत्रण धोरण राबविण्‍यात आले. वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी चीन सरकारने १९७१ मध्‍ये 'एक अपत्‍य' योजना अत्‍यंत कठोरपणे राबवली. एकापेक्षा जास्त अपत्ये जन्माला आल्यास शिक्षेची तरतूदही करण्यात आली होती.

सरकारी तिजोरीवर अतिरिक्‍त भार पडणार

चीनमधील मागील जनगणनेवेळी ६० वर्षांवरील सध्याची लोकसंख्या २६.४ कोटी (१८.७ टक्के) इतकी होती. गेल्या जनगणनेपेक्षा या संख्‍येत ५.४४ टक्क्यांनी वाढ झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते. वृद्धांची वाढत्या लोकसंख्येमुळे चीनच्या सरकारी तिजोरीवरचा भारही वाढत असून, सरकारला निवृत्ती वेतनावर अधिक खर्च करावा लागत आहे. येत्या काळात हा खर्च आणखी वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.  लोकसंख्‍येचा विचार करता जगातील सर्वात वृद्ध लोकसंख्‍या चीनमध्‍ये आहे. मात्र लोकसंख्‍येच्‍या टक्‍केवारीनुसार जपानमध्‍ये सर्वाधिक वृद्ध लोकसंख्‍या आहे.

आता लोकसंख्‍या वाढीसाठी विविध उपाययोजना

लोकसंख्‍या कमी झाल्‍याने चीनमध्‍ये नवीन सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. घटत्‍या लोकसंख्‍येमुळे चिंतेत असलेले सरकार आता लोकसंख्‍या वाढीसाठी विविध उपाययोजना आखात आहे. एकापेक्षा अधिक मुले जन्‍माला घालण्‍यासाठी
दाम्‍पत्‍यांना प्रोत्‍साहन दिले जात आहे. त्‍यामध्‍ये आर्थिक लाभासह सामाजिक सुरक्षेच्‍या विविध योजनांचा समावेश आहे. मात्र देशभरात घरांच्‍या वाढत्‍या किंमती, शिक्षण, आरोग्य इत्यादींवरील वाढत्या खर्चामुळे लोकांना अधिक मुले जन्माला घालण्याची इच्छा नसल्याचे दिसत आहे. त्‍यामुळे पुढील काही वर्षांमध्‍ये वृद्धांचा देश, असे बिरुद मिरविण्‍यासाठी सज्‍ज
झालेल्‍या चीनमध्‍ये नवे सामजिक प्रश्‍न निर्माण होण्‍याची भीती आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news