Rishab Pant Tweet : अपघातानंतर ऋषभचे पहिले ट्विट; म्हणाला…

Rishab Pant Tweet : अपघातानंतर ऋषभचे पहिले ट्विट; म्हणाला…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार खेलाडू ऋषभ पंत याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या भीषण अपघातामधून तो थोडक्यात बचावला. गंभीर जखमी झालेल्या पंतवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर आता ऋषभ पंतने पहिले ट्विट केले आहे. अपघातानंतरच्या सर्व परिस्थितीवर त्याने माहिती दिली आहेत. (Rishab Pant Tweet)

पंतने ट्विटरच्या माध्यमातून आज सर्वांशी साधला आहे. या ट्विटमध्ये त्याला दिलेल्या आशिर्वादाबद्दल आणि त्याच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच माझ्यावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. माझ्या पुढील वाटचालीसाठी मी तयार आहे. त्याचबरोबर आगामी आव्हाने माझी वाट पाहत आहेत, असे देखील या पोस्टमधून तो म्हणाला आहे. पंत या ट्विटमधून भावनिक झाल्याचे समजते. तसेच या ट्विटवरील पोस्टच्या माध्यमातून त्याने BCCI चे देखील आभार मानले आहे. (Rishab Pant Tweet)

३० डिसेंबर २०२२ रोजी ऋषभचा अपघात झाला. या अपघाताने त्याला खूप भयंकर स्थिती सामोरे जावे लागले आहे. पहाटेच्या वेळी डुलकी लागल्याने कारवरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली असे त्याने याआधी सांगितले होते. अगदी काही क्षणांमध्ये झालेल्या अपघातात त्याच्या कारचा चक्काचूर झाला होता. या अपघातात त्याच्या कपाळावर दुखापत झाली. तसेच त्याच्या उजव्या गुडघ्यावरील लिगामेंटला इजा पोहोचली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news