Single Women : देशात सिंगल महिलांची संख्या 7.5 कोटींवर | पुढारी

Single Women : देशात सिंगल महिलांची संख्या 7.5 कोटींवर

आपल्या भारतात सिंगल (Single Women)  राहण्याचे प्रमाण ही संख्या 7.5 कोटी झाली असून एकूण लोकसंख्येचा विचार केला तर हे प्रमाण 20 टक्के झाले आहे. ही धोक्याची घंटा म्हटली पाहिजे. स्वतःचे निर्णय स्वतः घेणे, आसपासची सामाजिक परिस्थिती, वाढत्या जबाबदार्‍या आणि असमानता ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे ‘स्टेटस सिंगल’ कम्युनिटीच्या संस्थापक श्रीमई पियू कुंडू यांनी म्हटले आहे.

  • 2011 च्या जनगणनेनुसार भारताती सिंगल महिला 7.14 कोटी
  • 2001 मध्ये ही संख्या होती 5.12 कोटी
  • 2001 ते 2011 यातील वाढ 40 टक्के

Virgin Tree : प्रेयसी मिळवून देणारे झाड!

2011 मध्ये अविवाहित युवकांचे प्रमाण 17.2 टक्के 2019 मध्ये ते 23 टक्के झाले.
विवाह नको असलेल्या महिला 2011 मध्ये 13.5 टक्के 2019 पर्यंत हेच प्रमाण वाढून 19.9 टक्के
विवाहापासून नको असलेल्या पुरुषांची टक्केवारी 2011 मध्ये 20.8 टक्के यात नव्याने झालेली वाढ 26.1 टक्के

विवाहित महिलांच्या मुख्य तक्रारी (Single Women)

  • सन्मानाने जगण्याचा अधिकार 31 टक्के
  • कौटुंबिक हिंसाचार 23 टक्के
  • हुंड्यासाठी छळवणूक 13 टक्के

विवाहाचा वाईट अनुभव आल्यामुळे जास्त घटस्फोट होत असलेली राज्ये

मिझोराम, प. बंगाल, गुजरात, छत्तीसगड, केरळ.

भारतात सिंगल वूमनची संख्या वाढत चालली असली तरी देशातील 90 टक्के युवकांचा आजही लग्नसंस्थेवर गाढ विश्वास आहे.
– इम्तियाज अहमद, समाजशास्त्रज्ञ (जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ)

Back to top button