

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा : भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील तिघे जण जागीच ठार झाले. तर एक महिला जखमी झाली. ही घटना अजिंठा महामार्गावरील मढ फाट्याजवळ असलेल्या महानुभाव आश्रमासमोर आज (दि.१४) दुपारी ३ च्या सुमारास घडली. तीनही मृतांचे व जखमी महिलेचे नाव कळू शकले नाही. मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर सुरूशे (वय ४०, रा. पानवडोद, जि. औरंगाबाद), अमर रामेश्वर जाधव (वय १५, रा. शिवणी टाका), वरद अनंता वैद्य (वय ७, रा. कोलवड, ता. बुलडाणा) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. तर वनिता दामोदर सुरूशे (वय ३५, रा. पानवडद, जि. औरंगाबाद) असे जखमी महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गिट्टी घेऊन बुलडाण्याकडे येत असलेल्या भरधाव टिप्परने समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकी चालक ( अंदाजे वय ४०) त्याच्याबरोबर असलेली दोन मुले जागीच ठार झाली. तर गंभीर जखमी झालेल्या ३५ वर्षीय महिलेला उपचारासाठी बुलडाणा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या महिलेचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दुचाकीवरून एकूण चार जण प्रवास करीत होते. त्यात पती, पत्नी, त्यांचा मुलगा व एक नातेवाईकांचा मुलगा होता. ते सर्वजण दुचाकीवरून मढ गावाकडून औरंगाबाद जिल्ह्यातील पान वडोद या आपल्या गावाकडे जात होते.
हेही वाचलंत का ?