Temba Bavuma : बावुमाकडे रोहितचा विक्रम मोडण्याची संधी! | पुढारी

Temba Bavuma : बावुमाकडे रोहितचा विक्रम मोडण्याची संधी!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना आज (14 जून) विशाखापट्टणम येथील एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवण्याची संधी आहे. तर त्यांचा कर्णधार टेंबा बावुमालाही रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढू शकतो.

कर्णधार म्हणून पहिल्या 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत टेंबा बावुमा रोहित शर्मासोबत संयुक्तपणे शीर्षस्थानी आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून पहिले 12 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. टेंबा बावुमानेही तेवढ्याच सामन्यात विजय मिळवला आहे. रोहितला मात्र कर्णधार म्हणून 16 वा टी 20 सामना गमवावा लागला.

अशा परिस्थितीत भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात बावुमा यशस्वी ठरला तर तो रोहित शर्माच्या पुढे जाईल. बावुमा आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क, अफगाणिस्तानचा असगर अफगाण आणि पाकिस्तानचा सरफराज अहमद यांनीही कर्णधार म्हणून पदार्पणाच्या 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 12-12 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाने सन 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोणत्याही फॉर्मेटमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने डिसेंबर 2021 पासून टीम इंडियाविरुद्ध 2 मालिका (एक कसोटी आणि एक वनडे) जिंकल्या आहेत.

भारताविरुद्धच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक हेनरिक क्लासेनने आतापर्यंत एका सामन्यात 81 धावा केल्या आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 81 धावा केल्या, म्हणजे क्लासेनने संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये 55.5% योगदान दिले.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताविरुद्ध क्रमांक 4 नंतर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूने केलेल्या सर्वोच्च धावांच्या बाबतीत हेनरिक क्लासेन हा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यामध्ये श्रीलंकेचा दासुन शनाका पहिल्या क्रमांकावर आहे. तो 2022 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने 74 धावा केल्या, ज्या संघाच्या एकूण 60.7 % होत्या.

Back to top button