पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला उद्या पासुन (दि.१३) सुरुवात होत आहे. पहिल्या टप्प्यातील कामकाजावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. दरम्यान अधिवेशनातील रणनीती निश्चित करण्यासाठी आज सकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी नेत्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. ( Budget session of Parliament )