Haryana RSS Meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये महिलांच्‍या सहभागाबाबत विचार सुरु | पुढारी

Haryana RSS Meeting : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये महिलांच्‍या सहभागाबाबत विचार सुरु

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये महिलांचा सहभागाबाबत संघात विचार सुरू आहे. याबाबत  लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. सध्‍या महिलांचा दुर्गा वाहिनी आणि इतर संघटनांशी संबंध होता. आता थेट त्यांना संघाच्या शाखांमध्ये सहभागी करून घेण्याबाबत विचार सुरु आहे. विविध प्रस्तावांवर संघाच्या वार्षिक बैठकीत (Haryana RSS Meeting)  चर्चा होणार असल्‍याचे सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

समलखा येथील पट्टिकल्याण गावातील सेवा साधना व ग्रामविकास केंद्रात अखिल भारतीय लोकप्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीला आज (दि. १२) पासून (Haryana RSS Meeting) सुरुवात झाली. यावेळी संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी महिलांना शाखांमध्‍ये सहभागाबाबत माहिती दिली. तत्पूर्वी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसाबळे यांनी पहिल्या दिवसाच्या सभेला सुरुवात केली.

डॉ. मनमोहन वैद्य यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४२ हजार ६१३ दैनंदिन शाखा सुरू करण्यात येत आहेत. याशिवाय साप्ताहिक व मासिक सभाही आयोजित केल्या जातात. मासिक सभांमध्ये स्वयंसेवक गावोगावी जाऊन राष्ट्रीय आणि सामाजिक विषयांवर चर्चा करतात. त्यानंतर येणाऱ्या विषयांवर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत चर्चा केली जाते. सभेची तीन दिवसीय बैठक वर्षातून एकदा मार्च महिन्यात होते. यामध्ये विविध विभागांचे व संस्थांचे अधिकारी सहभागी होतात.

Haryana RSS Meeting : २०२० नंतर संघाच्या शाखांमध्ये वाढ

२०२० नंतर संघाच्या शाखांमध्ये वाढ झाली आहे. यावर्षी शताब्दी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. २०२५ पर्यंत शाखांची संख्या १ लाखापर्यंत नेण्यात येणार आहे. यामध्ये प्राथमिक शिक्षणापासून शाखा सुरू केल्या आहेत. संघाने देशाची ९११ जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे. त्यापैकी ९०१ जिल्ह्यांमध्ये ९० टक्के शाखांचे काम सुरू आहे. शताब्दी वर्ष सुरू झाल्यानंतर संघाचे १३०० विस्तारक गावोगावी पाठविले आहेत. लवकरच आणखी १५०० विस्तारक पाठविण्यात येणार आहेत.

तीन दिवसीय बैठकीत विविध प्रस्तावांवर होणार चर्चा

अखिल भारतीय लोकप्रतिनिधी सभेच्या तीन दिवसीय बैठकीत सामाजिक समरसतेसाठी पहिला प्रस्ताव आणला जाणार आहे. यामध्ये भारताच्या विकासाचे धोरण ठरविले जाईल. त्यासाठी समाजाचे सहकार्य व ते पूर्ण करण्याचा मार्ग सांगितला जाईल. दुसरा अध्याय सर्व धर्मांवर असेल. यामध्ये सर्वांना सहभागी करून घ्यावे लागेल. त्याअंतर्गत भगवान महावीरांच्या परिनिर्वाणाचा जीवन संदेश आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे जन्मशताब्दी वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे जीवन आणि तत्त्वे लोकांना सांगायची आहेत. २०२४ मध्‍ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनकार्य आणि संदेश लोकांपर्यंत पोहोचवणे हा तिसरा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button