चंद्रपूर : चिमूरचे आमदार भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, बदनामी प्रकरणी दाम्पत्यावरही गुन्हा दाखल | पुढारी

चंद्रपूर : चिमूरचे आमदार भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा, बदनामी प्रकरणी दाम्पत्यावरही गुन्हा दाखल

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी चिमूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाला आहे. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांचे भाऊ साईनाथ (अश्वमेघ) बुटके व त्यांच्या पत्नी यांनी मारहाण व विनयभंग केल्याची तक्रार दिली  आहे. तर आमदार भांगडिया यांच्या कुटुंबियांची सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्लील भाषेत बदनामी केल्याच्या आरोपावरून साईनाथ बुटके व त्यांच्या पत्नीवर गुन्हे दाखल केला आहे.

कार्यकर्त्यासह आमदार भांगडिया यांनी घरात घुसून मारहाण करून विनयभंग केल्याची तक्रार साईनाथ बुटके यांच्या पत्नीने केली आहे. त्यानुसार चिमूर पोलीस ठाण्यात आमदार भांगडिया यांच्यावर विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे कार्यकर्ते अमीत जुमडे, लल्ला असावा, गोलू भरडकर, बब्बू खॉन, निखिल भुते, आशिष झिरे अन्य कार्यकर्त्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमदार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनीही, त्यांचे कुटुंबीय आई, पत्नी व वडिलांना अश्‍लील भाषेतील मजकूर सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याच्या आरोप केला आहे. या प्रकरणाची आमदार भांगडिया यांनी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर साईनाथ (अश्वमेघ) बुटके व त्यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हे दाखल करण्‍यात आला आहे. दरम्यान, चिमूरमध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी व उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष लोपानी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

हेही वाचा : 

Back to top button