China Australia War Alert : येत्या तीन वर्षात ऑस्ट्रेलिया-चीन युद्ध भडकणार? वाचा काय सांगतो ऑस्ट्रेलियन मीडिया रिपोर्ट

china Australia war alert
china Australia war alert

पुढारी ऑनलाइन डेस्क : China Australia War Alert : येत्या तीन वर्षात ऑस्ट्रेलिया चीन युद्ध भडकू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने चीनसोबत युद्धासाठी तयार राहावे, असा सल्ला ऑस्ट्रेलियातील काही प्रमुख वृत्तपत्रांनी ऑस्ट्रेलियन सरकारला दिला आहे. ऑस्ट्रेलियातून प्रकाशित होणा-या दोन मुख्य वृत्तपत्तांनी पंतप्रधान अल्बानीज यांना सरकारने चीन सोबत युद्धासाठी तयार रहावे, असे म्हटले आहे. द सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एज या वृत्तपत्रांनी रेड अलर्ट या शीर्षकाखाली हा अहवाल दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाला पुढील तीन वर्षात चीनसोबत युद्धासाठी तयार राहायला हवे. अमर उजाला, ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

वृत्तात म्हटले आहे की हा अहवाल पाच मोठ्या सुरक्षा विश्लेषकांशी चर्चा केल्यानंतर तयार करण्यात आला आहे. यामध्ये एलन फिंकेल, पीटर जेनिंग्स, लाविना ली, मिक रायन आणि लेस्ली सीबैक यांच्या नावांचा समावेश आहे. अहवालात म्हटले आहे ऑस्ट्रेलियायी नागरिक विचार करतात त्यापेक्षा ही अधिक संघर्ष चीन आणि तैवानमध्ये होऊ शकतो. याचा थेट परिणाम ऑस्ट्रेलियावर पडू शकतो. त्यामुळे सरकारला वेगाने युद्धाची तयारी सुरू करायला हवी. अहवालात पुढे म्हटले आहे, "ऑस्ट्रेलियाच्या अमेरिकेसोबतच्या मैत्रीमुळे, कोणत्याही प्रकारच्या युद्धाकडे पाठ फिरवणे आपल्यासाठी खूप कठीण होऊ शकते."

China Australia War Alert : ऑस्ट्रेलियाला अकस्मात येणा-या संकटांना तोंड द्यावे लागू शकते

अहवालात म्हटले आहे, अनेकजण फक्त तैवान वर हल्ल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणे हे फक्त एवढ्यावरच सीमित नसू शकते. ऑस्ट्रेलियाला याशिवाय अकस्मात पणे येणा-या मोठ्या समस्यांशी देखील संघर्ष करावा लागू शकतो. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने अशा आकस्मित येणा-या संकटांचा मुकाबला करण्यासाठी तयारी करायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पुढील युद्ध पूर्वीच्या युद्धाप्रमाणेच कधीही नसते, यावरही त्यांनी भर दिला आहे.

China Australia War Alert : युद्धाच्या तयारीसाठी तीन वर्ष का?

अहवालात म्हटले आहे की, "युद्धाच्या धोक्याचे आमचे विश्लेषण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आक्रमक वृत्तीवर आणि लष्करी क्षमता वाढवण्याच्या पावलांवर आधारित आहे. चीनकडून आलेल्या कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे फक्त तीन वर्षांचा कालावधी आहे. 2027 च्या आसपास, जेव्हा तैवान सामुद्रधुनीमध्ये बीजिंगची लष्करी क्षमता अमेरिकेपेक्षा जास्त होईल."

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news