Latest
Punjab CM : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ बॉम्ब; घटनास्थळापासून घर जवळ
पुढारी ऑनलाईन डेस्क : चंदीगडमध्ये पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हेलिपॅडजवळ जिवंत बॉम्ब सापडला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी (दि. २) घडलेल्या या घटनेने पोलिसांनी आजूबाजूचा सर्व परिसर सील केला.
बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे घर आणि हेलिपॅड जवळ आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे घरही याच परिसरात आहे. कंसल टी पॉइंट ते नया गाव दरम्यान असलेल्या आंब्याच्या बागेत हा बॉम्ब सापडला. बॉम्ब सापडलेल्या ठिकाणापासून हेलिपॅडचे अंतर सुमारे एक किलोमीटर आहे. त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या घरांमधील अंतर सुमारे दोन किलोमीटर आहे.
आपत्ती विभागाचे अधिकारी संजीव कोहली यांनी या घटनेची सर्व माहिती दिली. या घटनेने सध्या या परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा
- IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सामने 'असे' पाहा फ्री! जाणून घ्या…
- Kapil Dev : 'ड्रायव्हर परवडतो मग एकट्याने कार का…', पंतच्या अपघातावर कपिल देव यांचे मोठे विधान
- Rahul Gandhi and Kamal Haasan : 'हे राम', खादी, भारत-चीनसंबंध… राहुल गांधी-कमल हसन यांची 'चर्चा' व्हायरल
- Demonetisation : केंद्राचा नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता : सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
- Breaking News : Suryanagari Express train derailed : 'सूर्यनगरी एक्सप्रेस' वांद्रे टर्मिनस-जोधपूर येथे रुळावरून घसरली, 11 डबे प्रभावित…
- LPG Price : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; व्यावसायिक गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

