

पुढारी ऑनलाइन डेस्क : वांद्रे टर्मिनस-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे 8 डबे आज पहाटे 3.27 वाजता जोधपूर विभागातील राजकियावास-बोमाद्रा सेक्शन दरम्यान रुळावरून घसरले. कोणतीही जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दरम्यान रेल्वेने जोधपूरहून एक अपघात मदत ट्रेन रवाना केली आहे, अशी माहिती सीपीआरओ, उत्तर पश्चिम रेल्वे यांनी दिली आहे. Suryanagari Express train derailed
Suryanagari Express train derailed : त्यांनी सांगितले की, घटनेत 11 डबे प्रभावित झाले असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाव्यवस्थापक-उत्तर पश्चिम रेल्वे आणि इतर उच्च अधिकारी जयपूर येथील मुख्यालयातील नियंत्रण कक्षात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अडकलेल्या प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे जेणेकरून ते सुखरुप आपल्या घरी पोहोचतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Suryanagari Express train derailed : "मारवाड जंक्शनवरून निघाल्यानंतर 5 मिनिटांच्या आत, ट्रेनच्या आत कर्कश मोठा आवाज आला आणि 2-3 मिनिटांनंतर, ट्रेन थांबली. आम्ही खाली उतरलो आणि पाहिले की किमान 8 स्लीपर क्लासचे डबे रुळावरून उतरले आहेत. 15-20 च्या आत काही मिनिटांत, रुग्णवाहिका आल्या," असे एका प्रवाशाने सांगितले आहे.
दरम्यान, प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहे.
जोधपूरसाठी: ०२९१२६५४९७९, ०२९१२६५४९९३, ०२९१२६२४१२५, ०२९१२४३१६४६
पाली मारवाडसाठी: ०२९३२२५०३२४
प्रवासी आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही माहितीसाठी – 138 आणि 1072- या क्रमांकावर संपर्क साधू शकतात: CPRO, उत्तर पश्चिम रेल्वे