IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सामने ‘असे’ पाहा फ्री! जाणून घ्या… | पुढारी

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सामने ‘असे’ पाहा फ्री! जाणून घ्या...

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs SL T20I Series : टीम इंडिया नवीन वर्षातील आपल्या मोहिमेला श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेने करणार आहे. मालिकेतील पहिला सामना पहिला सामना 3 जानेवारीला मुंबईत खेळवला जाणार आहे. 2022 मध्ये टीम इंडियाला जागतिक स्पर्धांमध्ये फारसे चांगले यश मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने (BCCI) संघात बरेच बदल केले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल (KL Rahul) दोघेही टी-20 मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघात नाहीत. विराट कोहलीलाही (Virat Kohali) स्थान मिळालेले नाही. रोहितला दुखापत झाली आहे, त्यामुळे तो बाहेर आहे. तर विराट आणि राहुल यांना विश्रांती देण्यात आल्याचे कारण सांगण्यात येत आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले असून अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आली आहे.

IND vs SL T20I Series चे थेट प्रक्षेपण असे पहा

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. सर्व सामने संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील. या मालिकेनंतर वन डे मालिकेचेही आयोजन करण्यात आले आहे. हे सामने दुपारी 2 पासून सुरू होतील. पण सर्वात मोठा प्रश्न आहे की हे सामने आपल्याला कसे पाहता येतील? टीव्ही आणि मोबाईलवर सामन्याचे थेट प्रक्षेपण कुठे पहायला मिळेल? (IND vs SL T20I Series)

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. म्हणजेच, टीव्हीवर, तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर जाऊन ते पाहू शकता. जर तुम्हाला मोबाइलवर सामन्यांचा आनंद लुटायचा असेल तर डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या व्यतिरिक्त अन्य कुठे सामने पाहता येतील का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असे आहे. (IND vs SL T20I Series)

डीडी स्पोर्ट्सवर देखील थेट प्रक्षेपण (IND vs SL T20I Series)

भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील सर्व सामने डीडी स्पोर्ट्सवर पहायला मिळणार आहेत. परंतु यासाठी तुमच्या घरी डीडी फ्री डिश बसवणे आवश्यक आहे. तुमचे दुस-या कंपनीच्या डिशशी कनेक्शन असल्यास, तुम्ही येथे डीडी स्पोर्ट्सवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकणार नाही. सर्व सहा सामने येथे पाहण्यास उपलब्ध असतील. दूरदर्शन स्पोर्ट्सने या संदर्भात एक ट्विट देखील केले आहे. (IND vs SL T20I Series)

Back to top button