Maharashtra Tourism : ‘निसर्गराजा कड्यावरच्या गणपती’ला कधी भेट दिलीय का? | पुढारी

Maharashtra Tourism : 'निसर्गराजा कड्यावरच्या गणपती'ला कधी भेट दिलीय का?

स्वालिया शिकलगार- पुढारी ऑनलाईन डेस्क : मुलांना सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहे. उन्हाळ्यात चांगलेच तापमान वाढले आहे. पण इतक्या कडक उन्हाळ्यात फिरणार कुठे? असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर चिंता करू नका. (Maharashtra Tourism) आम्ही आज निसर्गरम्य ठिकाणांची माहिती येथे देणार आहोत. ज्या ठिकाणाला ‘निसर्गराजा’ असंही म्हटलं जातं. एका मिनी रेल्वेचं इंजिन चालवणाऱ्या माणसाने हा गणपती साकारायचा ठरवला आणि दगडात साकारला गेला १०० फूटी उंच कड्यावरचा गणपती. आज हे कड्यावरचा गणपती असेलेले ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. (Maharashtra Tourism)

‘कड्यावरचा गणपती’ माथेरान येथे स्थित असून हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. विद्येची देवता गणपतीला जाता जाता अनेक गिर्यारोहकदेखील येथे येतात. येथील पेबचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे. जर तुम्ही माथेरानला गेला तर कड्यावरच्या गणपतीला नक्की भेट द्या.

संग्रहित

सुखद वातावरण, हिरवीगार झाडी, डोंगर, प्रदूषणरहित हवा, मंत्रमुग्ध करणारे वातावरण अनुभवण्यासाठी माथेरानला एकदा तरी नक्की जा!

माथेरान-

अनेक हिल्स स्टेशनपैकी एक असलेले महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान. पश्चिम घाटातील सह्याद्री रांगेमधील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाते. माथेरान समुद्रसपाटीपासून जवळपास २६०० फूट उंचीवर स्थित आहे. वीकेंडला फिरण्यासाठी, एकापेक्षा एक परफेक्ट ठिकाणे म्हणून लोकप्रिय आहे. माथेरानला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलं आहे.

माथेरानमध्ये काय खाल?

वडापाव, चिक्की, कबाब प्रसिद्ध आहे. दाल खिचडी, छोले भटुरे, पनीर मसाला, व्हेज बिर्याणी, चना मसाला, मिसळ पाव, व्हेज पुलाव, महाराष्ट्रीयन आणि गुजराती, चायनीज, पंजाबी पदार्थदेखील येथे मिळतात.

वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. जर तुम्ही ट्रेकर असाल तर एप्रिल-मे मध्ये ट्रेकिंग करण्यास उत्तम काळ असतो.

संग्रहित

कुठे राहाल?

येथे राहण्यासाठी हॉटेल, लॉज वा रिसोर्टची व्यवस्था उपलब्ध आहे.

कसे जाल?

माथेरानला बसने जाता येते. रेल्वेने जाण्यासाठी माथेरानमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे जे टॉय ट्रेनच्या माध्यमातून नेरळ जंक्शनशी जोडले गेले आहे. आणि लोकल रेल्वेने कर्जत जंक्शनशा जोडलेले आहे.

कड्यावरचा गणपती

येथील भव्य गणपती नजरेस भरतो. विशालकाय मूर्ती पाहून प्रत्येक भाविक, पर्यटक श्रद्धेने इथे थांबतो. येथील गणपचीची मूर्ती नजरेस भरणारी आहे. मॉन्सून नंतर इथे निसर्गाने पांघरलेला हिरवागार शालू आणि दाट धुक्याची बोचणारी थंडी असते. हा निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही पावसाळ्यानंतरचादेखील प्लॅन करू शकता. मूर्तीच्या अवतीभोवती असणारे डोंगर, आणि निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात न मावणारे असते.

कसे जाल?

नेरळ स्थानकावरून माथेरानला जायला टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच टॉय ट्रेन जाते…घाटात मद्यात उतरून चालत अर्धा तासात कड्यावरचा गणपतीकडे जाता येते. नेरळ ते माथेरान २२ किमी. चे अंतर आहे. टॅक्सीने गेलात तर ९ किमीचे अंतर असून माथेरानला पोहोचण्यास २० मिनिटे लागतात. माथेरानच्या एन्ट्री पॉईंटपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीने येऊ शकता. येथे पार्किंगची व्यवस्थादेखील आहे. भारतातील ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे. हिल स्टेशनवर दुचाकी आणि चारचाकी गाड्य़ांना परवानगी नाही.

संग्रहित

हिल स्टेशनला पोहोचण्यासाठी ई -ऑटो, हॉर्स रायडिंग, बग्गी आणि टॉयट्रेन ही साधने उपलब्ध आहेत.

कधी जाल?

ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ येथे जाण्यासाठी उत्तम मानला जातो.  (Maharashtra Tourism)

संग्रहित

विकटगड/पेबचा किल्ला🚩

माथेरानजवळील पेबचा किल्ला किंवा विकटगडला ट्रेकर्स भेट देत असतात. कड्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन पेबच्या किल्ल्याला जाता येते.

शिवसंग्रहालय –

इको पॉईंटच्या बाजूला शिवसंग्रहालय आहे. येथे शिवकालीन शस्त्रे आदी वस्तू पाहायला मिळतील.

अंबरनाथ मंदिर

माथेरानमध्ये अंबरनाथ मंदिर असून इसवी सन १०६० मध्ये निर्मिती केल्याचे म्हटले जाते.

मंकी पॉईंट

मंकी प्वाईंटमध्ये माकडांची संख्या अधिक आहे.

संग्रहित

नेरळ माथेरान टॉय ट्रेन

नेरळ माथेरान टॉय ट्रेन सन १९०० मध्ये सुरु केल्याचे सांगितले जाते. आदमजी पीरभॉय द्वारा ही रेल्वे बनवल्याचे सांगितले जाते.

माथेरानमध्ये आणखी काय पाहाल?

खदान -शिव टेंपल, शिव मंदिर अंबरनाथ ईस्ट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, पलंग पॉईंट, लुईस पॉईंट, एलेक्जेंडर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, ओलंपिया रेसकोर्स, लॉर्डस पॉईंट, सेसिल पॉईंट, पनोरमा पॉईंट अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.

खदान -शिव टेंपल

पनोरमा पॉईंटमधून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं जाऊ शकतं. लूईजा पॉईंटवरून प्रबळ किल्ल्याचे सुस्पष्ट दर्शन होतं. वन ट्री हिल पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, पोर्क्युपाईंन पॉईंट, रामबाघ पॉईंट अशी मुख्य ठिकाणेही पाहता येतील.

हेदेखील वाचा – 

Back to top button