स्वालिया शिकलगार- पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकात गेल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येतात ती म्हणजे तेथीलअप्रतिम मंदिरे. (Historical Tourism) अनेक वास्तूंनी सजलेली शहरे, शिल्पे, मूर्ती अशी ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यायलाचं हवी. नेहमीच्या कामातून थोडा वेळ काढून तुम्ही ही ठिकाणे फिरून येऊ शकता. आम्ही येथे काही ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणार आहोत, जी पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही की, अद्यापही काही मंदिरे सुस्थितीत आणि आत्मिक शांतता देणारे आहेत. आपल्या इतिहासातील गोष्टी आपणांस डोळ्य़ांनी पाहता येतात, यापेक्षा दुसरे भाग्यचं नाही! तुम्ही जर अलमट्टीला गेला तर तेथून पुढे बदामी, पट्टडकल, आणि ऐहोळे या तीन ठिकाणांना नक्की भेट द्या. कर्नाटकातील या पर्यटनस्थळांची सफर तुम्हाला नक्की करायला हवी. (Historical Tourism)
अलमट्टी धरण (alamatti dam) –
अलमट्टी -अलमट्टी धरण हे उत्तर कर्नाटकात कृष्णा नदीवर बांधलेले विशाल धरण आहे. विजापूरपासून ६५ किमी अंतरावर विजापूर आहे. तर बंगळूरपासून ४५० किमी. अंतरावर आहे. अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. अलमट्टी धरण हे लाल बहादूर शास्त्री जलाशय म्हणूनही ओळखे जाते. धरणाची उंची ५२४. २६ फूट इतकी आहे. या धरणाला एकूण २६ दरवाजे आहेत.
कसे जाल?
बागलकोट स्टेशन जवळचे रेल्वे स्टेशन असून अलमट्टी हे ३५ किमी. अंतरावर आहे.
कुठे राहाल?
राहण्यासाठी येथे अनेक कॉटेजेस आणि हॉटेल्स आहेत. अलमट्टी धरण आणि रॉक गार्डन येथे संपूर्ण दिवस फिरता येते. महाराष्ट्र आणि कर्नाटक या सीमेवरील हे अलमट्टी धरण विशाल दृष्य नजरेत भरणारा ठरतो. या धरणावरील लाल बहादूर शास्त्री हे कन्नडमध्ये लिहिलेले फलक एक जागतिक विक्रम आहे. जगातील सर्वात लांब धातूच्या बोर्डावरील अक्षरे ही ॲल्युमिनियम आणि लोखंडापासून तयार करण्यात आली आहेत. अगदी चार किलोमीटर दूर अंतरावरून ही नावे व्यवस्थित दिसू शकतात.
विजापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर वसलेले हे ठिकाण असून अलमट्टी धरणाच्या अगदी जवळ हे गार्डन आहे. उत्तर कर्नाटकामध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. किरकोळ रक्कम भरून तुम्हाला एन्ट्री तिकिट मिळते. सुंदर तलाव असून यामध्ये बोटिंग करता येते. पारंपरिक ग्रामीण भागातील संस्कृती कशी होती, याची झलक या गार्डनमध्ये पाहता येते. दुतर्फा गर्द झाडी आणि सुंदर शिल्पे लक्ष वेधून घेतात. अनेक प्राणी, पक्षी आणि माणसांच्या मूर्ती येथे पाहायला मिळतात. कमळांनी फुललेले तलावदेखील तुम्हाला इथे पाहता येईल. वेगवेगळे शिल्प ग्रामीण संस्कृतीची झलक दाखवतात. विशेष, लहान मुलांसाठी टॉय ट्रेनदेखील उपलब्ध आहे. लेक गार्डन, म्युझिकल फाऊंटन गार्डन आहे. या गार्डनमध्ये वेगवेगल्या प्रकारची फुलझाडे पहायला मिळतात. वेगवेगळ्या दगडांवर शिल्पे कोरण्यात आली आहेत. फाऊंटन गार्डनमधील संध्याकळचा लेसर शो दैदिप्यमान ठरतो.
बदामी हे उत्तर कर्नाटकात असून अप्रतिम वास्तूकला येथे पहायला मिळते. बदामीमध्ये पाहण्यासाठी खूप सारे प्राचीन मंदिर, किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणे आहेत. रॉक-कट गुफा मंदिरांसाठी बदामी प्रसिद्ध आहे. तुम्हाला जर पर्यटन करायचे असेल तर बदामीला एकदा तरी नक्की भेट द्या. बदामी हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे.
रॉक कट मोनोलिथिक स्ट्रक्चर असलेली बदामी गुफा येथे पाहायला मिळते. एक आणि दुसऱ्या क्रमांकाच्या गुफा कितव्या शतकातील आहेत, याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. मात्र तिसऱ्या गुहेवर शिलालेख आढळतो. ही गुहा ६ व्या शतकातील असल्याचे म्हटले जाते. विष्णूला समर्पित असलेले ही गुफा आहे. हिंदू मंदिरे असलेली ही गुफा चालुक्यकालीन असल्याचे म्हटले जाते. बदामीत या चार गुफा असून एकावर एक मजले असल्याप्रमाणे त्या दिसतात. तीन गुफा हिंदू धर्माशी तर एक गुफा जैन धर्माशी संबंधित आहे.
पहली गुफा- भगवान शिवला समर्पित ही गुफा असून आतमध्ये १८ भुजा असणारी नटराजनची प्रतिमा पाहायला मिळते.
दुसरी गुफा – दुसरी गुफा भगवान विष्णुला समर्पित आहे.
तिसरी गुफा – तिसऱ्या क्रमांकाची गुफा भगवान विष्णूला समर्पित करण्यात आलीय. येथे हाळे कन्नड भाषेतील शिलालेख पाहायला मिळतो.
चौथी गुफा- चौथ्या क्रमांकाची गुफा भगवान महावीर यांना समर्पित करण्यात आलीय.
बदामी गुफाच्या समोरील डोंगरावर Lower Shri Shivalaya Gudi आणि Upper Shri Shivalaya Gudi अशी नजरत भरणारी मंदिरे आहेत.
मालेगट्टी शिवालय – एका मोठ्या डोंगरावर हे मंदिर असून बदामी शहरापासून २ किमी. दूर आहे. सातव्या शतकातील प्राचीन पाषाण मंदिरांपैकी हे एक आगे. द्रविड स्तंभांनी बनलेल्या शिवालयात दोन शिलालेख आहेत. अन्नाचे कोठार, किल्ल्याच्या दुतर्फा भिंती दीवारें, अनेक वास्तू आणि एक भूमिगत खोलीदेखील आहे. बदामीला जर तुम्ही गेला तर या किल्ल्याची सफर अवश्य करा. (Historical Tourism)
अगस्त्य तलाव – बदामी गुफाच्या समोर एक मोठे तलाव असून त्यास अगस्त्य तलाव असे नाव आहे. या तलावाच्या आजूबाजूला अनेक छोटी छोटी मंदिरे आहेत. या तलावाला पवित्र मानले जाते. कारण, या पाण्याने अनेक आजार दूर होतात, असे म्हटले जाते. आजूबाजूला डोंगर आणि त्यावर असलेली मंदिरे तुमचे लक्ष वेधून घेतात.
भूतनाथ मंदिर – कदंब नागरा स्थापत्य असलेले भूतनाथ मंदिर पटकन दिसत नाही. तलावाच्या शेजारी असलेल्या एका विशाल दगडाखाली हे मंदिर आहे. असं म्हटलं जातं की, या भूतनाथाच्या मूर्तीचा चेहरा सोन्याचा होता. पण, नंतर त्याची तोडफोड करून सोनं चोरून नेण्यात आले.
या संग्रहालयाची निर्मिती भारतीय पुरातत्व विभागाने १९७९ मध्ये केली होती. येथे प्राचीन शिलालेख, प्राचीन मूर्ती, शोधण्यात आलेल्या वस्तू, भांडी, दागिने पाहायला मिळतात. १९८२ मद्ये हे संग्रहालय म्हणून उभारण्यात आले. विशेष म्हणजे येथे भग्न अवस्थेतील लज्जा – गौरीची सुंदर मूर्ती पाहायला मिळते. ६ व्या शतकापासून ते १६ व्या शतकांदरम्यानचे वस्तू, मूर्ती आदी बाबी येथे पहायला मिळतात. या संग्रहालयात चार गॅलरी आहेत. भगवान शिव आणि भगवान विष्णूची मूर्ती विभिन्न रूपात पाहायला मिळतात. शिवाय गणपती आणि भगवद्गीतेतीत दृश्यदेखील चित्रित करण्यात आले आहेत. शिदलापहाडी गुफा एक अशी गॅलरी आहे जी पर्यटकांना प्राचीन गुफा कशा असतील, याची आठवण करून देते. वास्तुकलेशी संबंधित अनेक वस्तू येथे पाहायला मिळतात.
कसे जाल?
अलमट्टीतून बागलकोट मार्गे बदामीत जाता येते. येथे राहायला अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत.
काय खाल?
अप्पम, इडली, उत्तापा, भात रस्सम, भाजी, वरण आदी.
ऐहोळेतील श्री दुर्ग मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे. हे कर्नाटकमधील बदामी येथील एक छोटं गाव ऐहोळमध्ये असून एक सुंदर मंदिर आहे. या मंदिरात देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. रस्त्याहून या मंदिराकडे जाताना दोन्हीकडे अनेक मंदिरे दिसतात.
aihole Meguti Jaina Basadi
Sri Lad Khan Temple- ऐहोळेमधील श्री लाड खान मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे.
Ravana Phadi- ऐहोळमधील रावण पहाडी प्रसिध्द स्थळ असून येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
Chakra Temple – ऐहोळमधील हे सुंदर मंदिर डोळ्यात न मावणारे आहे.
Museum and Cultural Hall- बागलकोटमधील नव नगर येथे राधाकृष्ण मंदिराच्या शेजारी हे संग्रहालय आहे. ग्रामीण शैली दर्शवणाऱ्या मूर्ती, शिल्पे येथे पहायला मिळतात.
बदामी शहरापासून काही अंतरावर ऐहोळे गाव आहे.
पट्टडकल (pattadakallu)- ऐहोळेपासून काही किमी. अंतरावर पट्टडकल हे गाव आहे. दक्षिण भारतीय द्रविड आणि उत्तर भारतीय नागरा दोन्ही स्थापत्यशैलीतील मंदिरे पाहता येतात. येथे खूप अनेक मंदिरांचा समूह आहे, जे पाहायला संपूर्ण एक दिवस लागू शकतो. विरुपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिर तुमचे लक्ष वेधून घेतात. अनेक प्रथा-परंपरा, राहमीमान, जीवनपद्धती, परंपरा, युद्धे, सहजीवन, वेशभूषा, केशभूषा, शृंगार अशा अनेक गोष्टी शिल्प आणि मूर्ती रुपात तुम्हाला पाहायला मिळतात. (Historical Tourism)
येथे लिंगायत पद्धतीचे उत्कृष्ट चवीचे जेवण मिळते. येथील तूप लावलेली शेंगदाणा पोळी नक्की खा! लोणचे, दही, मटकची उसळ, ताक, चपाती, उकडा भात, वरण, रस्सम, आमटी असे सकस जेवण तुम्हाला मिळू शकते.
पट्टडकलमधील Sri Papanaatha Gudi हे मंदिर पाहण्यासारखे आहे. पटट्डकलच्या आजूबाजूला तुम्ही ही पुढील मंदिरे पाहू शकता. Sri Bachalingeshwara Temple (Bachingudda), Meguti Jaina Basadi, Aihole Museum, पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.
आपण कुठेही पाहिलं नसेल अशी शिल्पनक्षी पाहता येते. येथे गेल्यानंतर तुमचे मन प्रसन्न होईल. त्याकाळात कोणत्याही पद्धतीची अवजारे, मशीन नसताना इतकी सुंदर कलाकृती कशी निर्माण केली असावी? असा प्रश्न आपसुक पडतो! तुम्हाला जर ऐतिहासिक पर्यटन करायला आवडत असेल तर तुमच्या ट्रीपच्या यादीत ही ठिकाणे नक्की समाविष्ट करा. (Historical Tourism)