

येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार्या लोकसभा व विधानसभांच्या पोटनिवडणुकांसाठी ( By Polls ) भाजपने उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातून महेश गावित यांना उमेदवारी दिली आहे. मोहन डेलकर यांनी मुंबईमध्ये आत्महत्या केल्यानंतर दादरा नगर हवेलीची जागा रिकामी झाली होती.
मध्य प्रदेशातील खंडवा लोकसभा मतदारसंघात ज्ञानेश्वर पाटील यांना तर हिमाचल प्रदेशातील फतेहपूर मतदारसंघातून बलदेव ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेसोबत 16 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणुका ( By Polls ) होत आहेत. यात प. बंगाल, राजस्थान, कर्नाटक, हरियाना आणि आंध्र प्रदेशसह इतर काही राज्यातील जागांचा समावेश आहे.
कर्नाटकातील सिंदगी विधानसभा मतदारसंघात पक्षाने रमेश भूषणरु यांना तिकीट दिले असून हंगल मतदारसंघात शिवराज सज्जनहर यांना तिकीट दिले आहे. राजस्थानमधील वल्लभनगर आणि धारियावाड मतदारसंघातून क्रमशः हिम्मतसिंग झाला आणि खेतसिंग मीना यांना उमेदवारी देण्यात आली आहे.