

पुढारी ऑनलाईन डेस्क : मोतिहारीमध्ये येथील रामगढवाच्या नरीलगिरीमध्ये वीटभट्टीतील चिमणीमध्ये मोठा स्फोट झाला. वीट भट्टीच्या चिमणीमध्ये स्फोट झाल्याने ७ लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा आकडा ९ वर पोहोचल्याची माहिती समोर आलीय. १६ लोक गंभीर अवस्थेत असून त्यांच्यावर रक्सौलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनेनंतर जवळपासच्या लोकांमध्ये गदारोळ उडाला. बचाव कार्य सुरु आहे.
स्थानिक पोलिस आणि अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी उपस्थित आहे. जखमींची स्थितीदेखील खूप गंभीर आहे. लोकांचे म्हणणे आहे की – स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला होता. बिहार पोलिस मुख्यालयाकडून सांगण्यात आले की, या घटनेनंतर SDRF च्या टीमने घटनास्थळी पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन केंलं. मृत्यू झालेल्यांमध्ये ४ स्थानिक लोक होते आणि ३ उत्तर प्रदेशचे निवासी होते. पोलिसांकडून मदत सुरु आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…