माधुरी दीक्षितचे नाव वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत | पुढारी

माधुरी दीक्षितचे नाव वेगळ्याच गोष्टींमुळे चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वतःपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. ज्यात सलमान खानपासून ते अक्षय कुमारपर्यंत अनेक कलाकारांच्या नावाचा समावेश आहे. पण या यादीत काही अशाही अभिनेत्री ज्यांनी स्वतःपेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यांबरोबर ऑनस्क्रीन रोमान्स केला आहे. या अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री माधुरी दीक्षितचं नाव सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे. माधुरी दीक्षितने अभिनेते विनोद खन्ना आणि त्यांचा मुलगा अक्षय खन्ना या दोघांबरोबरही काम केलं होतं. माधुरीने १९८८ मध्ये हृदयावानफचित्रपटात विनोद खन्ना यांच्याबरोबर काम केलं होतं. हा चित्रपट त्यातील एका गाण्यामुळे बराच चर्चेत राहिला होता. आज फिर तुम पे प्यार आया हैफहे या चित्रपटातील गाणं प्रचंड गाजलं होतं आणि या गाण्यात विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांनी बोल्ड सीन दिले होते. दोघांच्या इंटिमेट सीनची बरीच चर्चा झाली होती. एकीकडे काही लोकांनी माधुरीवर टीका केली होती तर काहींनी या सीन्सना विरोधही केला होता कारण त्या काळात ते खूपच बोल्ड सीन होते.

Back to top button