Bigg Boss 16 : सलमानने भारतीच्या मुलाच्या नावे केला पनवेलचा फॉर्महाऊस?
पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १६ लोकांच्या खूप पसंतीस उतरत आहे. शोमध्ये जेव्हा वीकेंड का वार येतो, तेव्हा प्रेक्षकांची इच्छा असते की, काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. बिग बॉसच्या निर्मातेदेखील शो दमदार बनवण्यासाठी प्रत्येक आठवड्याला नवे नवे कलाकारांना घेऊन येतात. बिग बॉस १६ च्या या Shukrawar ka Vaar मध्ये भारती सिंह (Bharti Singh), हर्ष लिम्बाचिया (Haarsh Limbachiyaa) आणि लक्ष्य सिंह लिम्बाचिया (Laksh Singh Limbachiya) यांची एन्ट्री झाली. त्यांनी सलमान खानसोबत खूप सारी सारी केली. या मस्तीदरम्यान, सलमान खानचा पनवेलवाला फार्महाऊसचा संदर्भ मध्येच कसा आला, जाणून घेऊया.
सलमान खान-लक्ष्य सिंह लिम्बाचियाची मस्ती
बिग बॉस १६ च्या या शुक्रवार का वारमध्ये भारती सिंह, पती हर्ष लिम्बाचिया आणि मुलगा लक्ष्य सिंह लिम्बाचिया उर्फ गोला सोबत दिसली. बिग बॉसच्या मंचावर सलमान खानसोबत खूप मस्ती करता करता भारती एका कागदपत्रावर सलमानची सही घेते. आणि म्हणते की, थॅक्यू. तुम्ही पनवेलवाला फार्महाऊस लक्ष्यच्या नावे केला, साहित्य कधी हटवणार?
यानंतर सलमान खान खूप हसतो. सलमान खानने लोहिरीच्या निमित्ताने लक्ष्यला एक खास भेटवस्तू दिली. सलमान घालतो तसा खास ब्रेसलेट त्याने लक्ष्यलाही भेट म्हणून दिले. भारती सलमानला म्हणते – लक्ष्यलादेखील लॉन्च करा आणि गर्लफ्रेंड्स कसे करायचे याची आयडियादेखील दिली. सलमान खान हसत हसत म्हणतो आणि म्हणतो माझं स्वत:चं नाही बनलं. हा वीकेंड खूप मजेशीर राहणार आहे.

