नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह उपनगरांमध्ये विनापरवानगी मद्यविक्री सर्रास केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या सात ठिकाणी कारवाई करत पोलिसांनी संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई झोपडपट्टी परिसरात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित दिनेश साहेबराव चौरे (२४, रा. महालक्ष्मीनगर, अंबड) हा अंबडमधील अरिहंत पॅकिंग कंपनीच्या गोदामाजवळील मोकळ्या जागेत २,९०५ रुपये किमतीची देशी दारू विक्री करताना आढळला. संशयित किथ मॉरेस रॉड्रिक्स (४६, रा. चव्हाण मळा, नाशिकरोड) याच्याकडून देशी दारूच्या १२ बाटल्या, तर संशयित दिलीप शिवराम मोरे (४१, रा. पाथर्डी गाव, राजवाडा) याच्याकडून देशी दारूच्या ३९ बाटल्या पाेलिसांनी हस्तगत केल्या.
संशयित रमेश नागनाथ जाधव (५३, रा. कालिकानगर, फुलेनगर, पंचवटी) याच्याकडून १,४७० रुपये किमतीच्या २१, मनोज चंद्रभान केदारे (५०, रा. नारायण बापूनगर, उपनगर, नाशिकरोड) याच्याकडून २,१०० रुपये किमतीच्या ३०, अरविंद बाबूलाल सहानी (४२, रा. अंबड) याच्याकडून १,४०० रुपये किमतीच्या २०, तर सुनील एकनाथ साळवे (३५, रा. केवळ पार्क, अंबड) याच्याकडून १,४७० रुपये किमतीच्या २१ देशी दारूच्या बाटल्या पोलिस कारवाईत जप्त करण्यात आल्या.
हेही वाचा :