भंडारा :  वयाच्या पन्नाशीत २५५० पुशअप… 

पुरुषोत्तम चौधरी यांचा नवा विक्रम  वयाच्या पन्नाशीत २५५० पुशअप
पुरुषोत्तम चौधरी यांचा नवा विक्रम वयाच्या पन्नाशीत २५५० पुशअप
Published on
Updated on
डारा वृत्तसेवा : वयाची चाळीशी ओलांडली की हातपाय दुखतात म्हणून आजकाल बरेचजण सांगताना पाहायला मिळतील. मात्र वयाच्या ५० व्या वर्षी दोन तासात तब्बल २५५० पुशअप मारण्याचा विक्रम  भंडारा शहरातील पुरुषोत्तम चौधरी यांनी केला आहे. नियमित व्यायामाने शरीर मजबूत व आरोग्य सुदृढ राहते हेच त्यांनी सिद्ध करून दाखवले.

दोन तासाच्या कालावधीत तब्बल २५५० पुशअप


लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करिता प्रयत्नशील आहेत.  पुरुषोत्तम चौधरी यांच्या ५० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन काल २५ मार्च रोजी बहिरंगेश्वर व्यायाम शाळा भंडारा येथे करण्यात आले होते. यावेळी पुरुषोत्तम चौधरी यांनी पहाटे ५ ते ७ या दोन तासाच्या कालावधीत तब्बल २५५० पुशअप काढून नवीन विक्रम  केला आहे.

वयाच्या चौदाव्या वर्षापासून नियमित व्यायाम 

मोहाडी ग्रामीण रुग्णालयात शासकीय कर्मचारी असलेले पुरूषोत्तम हे वयाच्या चौदाव्या वर्षापासून नियमित व्यायाम करीत आहेत. यापुर्वी सन २०१२ मध्ये १४५० पुशअप काढल्याबद्दल त्यांची लिम्का बूक मध्ये नोंद झाली आहे. तर २०१७ मध्ये १९५० पूशअप काढून गिनिज बूकमध्ये नाव नोंदविण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र आर्थिक अडचणी अभावी यश येऊ शकले नाही. परंतु विश्वविक्रम करण्याची जिद्द मात्र त्यांनी सोडली नाही. याच जिद्दीतून आज पुन्हा एकदा दोन तासात २५५० पूशअप मारण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला आहे. ही नेत्रदीपक कामगिरी पहाण्याकरिता बंहिरंगेश्वर व्यायाम शाळेत आज एकच गर्दी झाली होती. चौधरी यांनी विक्रम पूर्ण करताच त्यांच्यावर कौतुक केले जात आहे. 
या कार्यक्रमाला बंहिरंगेश्वर व्यायाम शाळेचे अध्यक्ष गोपाळ हलमारे, माजी आमदार चरण वाघमारे, माजी नगरसेवक संजय कुंभलकर, बंटी मिश्रा, धनराज साठवणे, अ‍ॅड. मोहन भिवगडे, मोहाडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवाणे, संदीप सार्वे, अशोक चौधरी, बसप्पा फाये यांच्यासह बंहिरंगेश्वर व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तसेच शहरातील गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेश आंबिलकर यांनी तर आभार अ‍ॅड. सतिश ठवकर यांनी मानले.
हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news