Lyrid Meteor Shower : यंदाही शनिवार – रविवारी पाहता येणार लायरीड उल्कावर्षाव

Lyrid Meteor Shower : यंदाही शनिवार – रविवारी पाहता येणार लायरीड उल्कावर्षाव
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शनिवार व रविवारी (२२ व २३ एप्रिल) लायरीड उल्कावर्षावाचा (Lyrid Meteor Shower) पाहता येणार आहे. एप्रिल महिन्याच्या १५ ते २९ तारखे दरम्यान उत्तर-पूर्व दिशेला लायरा (lyra) तारासमूहात हा उल्कावर्षाव दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा सुरेश चोपणे यांनी पुढारीशी बोलताना दिली. (Lyrid Meteor Shower)

उत्तर-पूर्व दिशेला सूर्य मावळल्यानंतर लायरा तारा समूहात वेगा(Vega) ताऱ्याजवळ हा उल्कावर्षांव पाहता येईल. रात्री १०.३० वाजल्यापासून मध्यरात्री पर्यंत हा चांगला दिसू शकेल. या वर्षी ताशी १५ ते २५ उल्का दिसण्याचा अंदाज आहे. (Lyrid Meteor Shower)

हा उल्कावर्षाव थ्यॅचर (Thatcher) ह्या धूमकेतू मुळे दिसतो.१८६१ मध्ये हा धूमकेतू पृथ्वीजवळून गेला होता. तेंव्हापासून हा उल्कावर्षाव दिसत आहे. पुढे जेव्हा पृथ्वीचा भ्रमणमार्ग जवळून जाईल तेव्हा २० वर्षांनंतर २०४२ मध्ये खुप मोठा उलकावर्षाव दिसणार आहे. हा धूमकेतू पुन्हा २४५ वर्षाने म्हणजे २२७८ सालामध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे. तेव्हा उल्कांचा जणू पाऊस पडल्या सारखा दिसेल.

ह्या धूमकेतूचा (C १८६१ / G1) शोध अमेरिकेतील अल्फ़्रेंड थ्यॅचर ह्यानी ५ एप्रिल १८६१ मध्ये लावला.परंतु गेल्या २५०० वर्षांपासून प्राचीन लोकांनी हा उल्कावर्षाव पाहिला आहे. चिनी लोकांनी इ सन पूर्व ६८७ मध्ये हा उल्कावर्षाव पाहिल्याची नोंद आहे.

निरीक्षण कसे करावे

उल्कावर्षाव दुर्बिणीतून दिसत नाही, लहान (१०-× ५०) आकाराची द्विनेत्रीं असेल तर चांगले. अंधाऱ्या रात्री जमिनीवर लेटून आकाशात पाहिल्यास अतिशय उत्तम पद्धतीने उल्का वर्षाव निरीक्षण करता येते. सर्व खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमींनी हा उल्कावर्षाव पहावा. पडता तारा (उल्का) पाहिल्यास आपली कोणतीहि इच्छा पूर्ण होते ही अंधश्रद्धा आहे. अशी माहिती खगोल अभ्यासक व स्काय वॉचग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी पुढारीशी बोलताना दिली.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news