

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : पुलवामा हल्ल्याबद्दल केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस बजावले असल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप या संदर्भात सीबीआय कडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ( Satya Pal Malik)
भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात चौकशीसाठी मलिक यांना बोलावण्यात आले आहे. २७ आणि २८ एप्रिलला सीबीआयकडून मालिकांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. अकबर रोड येथील एका गेस्ट हाऊसमध्ये मालिकांची चौकशी केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जम्मू-काश्मीर मधील दोन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित अपहारासंबंधी मालिकांची चौकशी केली जाऊ शकते. मलिक राज्याचे राज्यपाल असताना या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ( Satya Pal Malik)
ऑक्टोबर २०२१ मध्ये आरएसएसच्या नेत्याने एक फाईल पास करण्यासाठी कथितरित्या ३०० कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा दावा मलिक यांनी केला होता. मलिक यांची गतवर्षी आक्टोबर मध्ये देखील चौकशी करण्यात आली होती.
अधिक वाचा :