Vande Bharat Train Hit Cow : ‘वंदे भारत’च्या धडकेत गाय उडून लघूशंका करणाऱ्या वृद्धावर आदळली; वृद्धासह गाईचा मृत्यू

वंदे भारत एक्‍स्‍प्रेस
वंदे भारत एक्‍स्‍प्रेस
Published on
Updated on

जयपूर; पुढारी ऑनलाईन : एक अत्यंत विचित्र आणि तितकाच दुर्दैवी अपघात राजस्थानमध्ये घडल्याचे समोर आले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने एका गाईला जोराची धडक दिली. धडकेनंतर ती गाय हवेत उडून रेल्वे ट्रॅक शेजारी लघुशंका करणाऱ्या वृद्ध व्यक्तीच्या अंगावर कोसळली. या दुर्घटनेत वृद्धव्यक्तीसह गाईचाही जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही घटना राजस्थानमधील अलवर या ठिकाणी घडली आहे. अलवर येथील कालीमोरी फाटका जवळ वंदे भारत एक्सप्रेसने रेल्वे ट्रॅकवर फिरणाऱ्या गाईला जोराची धडक दिली. (Vande Bharat Train Hit Cow)

अरावली विहार पोलिस ठाण्याचे अधिकारी जहीर अब्बास यांनी सांगितले की, दिल्लीहून अजमेरकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी (दि.१८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कालीमोरी फाटकपासून क्रॉसकरुन जात होती. याच दरम्यान फिरत ट्रॅकवर येणाऱ्या गाईला ट्रेनने जोरदार धडक दिली. ट्रेनच्या धडकेने गाय हवेत उडून ३० मीटर अंतरावर जाऊन पडली. पण, याच दरम्यान ट्रॅकशेजारी लघुशंका करणाऱ्या ८२ वर्षाच्या वृद्धावर ती गाय जावून पडली. या दुर्घटनेत त्या गाईसह वृद्धाचाही मृत्यू झाला. शिवदयाल शर्मा (रा. हिराबास, कालीमोरी) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. (Vande Bharat Train Hit Cow)

अधिक वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news